---Advertisement---

“विराट आणि बीसीसीआयमध्ये काही आलबेल नाही”, माजी निवडसमिती अध्यक्षांनी व्यक्त केला संशय

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने गुरुवारी (१६ सप्टेंबर) टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. पुढील महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर तो पदमुक्त होईल. त्याने ट्विटरवरून पोस्ट करत सर्वांना याबाबत माहिती दिली. विराटने राजीनामा दिल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यातच भारतीय संघाच्या माजी क्रिकेटपटू व निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले.

विराटच्या निर्णयाचा आदर करायला हवा
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष असलेल्या संदीप पाटील यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहलीच्या राजीनाम्याबाबत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले,
“विराटने हा एक चांगला निर्णय घेतला आहे. आपल्याला त्याच्या निर्णयाचा आदर करावा लागेल. नेतृत्वाच्या ओझ्याखाली अनेकदा खेळाडूंची चांगली कामगिरी होत नाही. टी२० संघाचे नेतृत्व सोडले तरी विराट आपल्या फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतो. एकाच वेळी नेतृत्व आणि फलंदाजी करणे इतके सोपे नाही.”

विराट आणि बीसीसीआयमध्ये संवादाची कमी
पाटील यांनी या मुलाखतीत विराट आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्या संवादाची कमी असल्याचे म्हटले. ते म्हणाले,
“सध्या बीसीसीआय आणि विराट यांच्यात सर्वकाही आलबेल नाही. त्यांच्यात संवादाचा अभाव दिसतोय. अनेकदा विराट एक आणि बीसीसीआय एक बोलत असते.”
काही दिवसांपूर्वी विराट कर्णधारपद सोडण्याची बातमी समोर आली होती. मात्र, त्यावेळी बीसीसीआयतर्फे कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी पुढे येथे या सर्व वृत्ताचे खंडन केलेले. मात्र त्यानंतर दोन दिवसातच विराटने टी२० कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला.

सात वर्षापासून विराट कर्णधार
विराट कोहली हा मागील सात वर्षापासून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. एमएस धोनीने २०१५ मध्ये अचानकपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर विराटला कर्णधार बनवण्यात आलेले. त्यानंतर, २०१७ मध्ये विराटकडे मर्यादित षटकांच्या संघाचेही नेतृत्व दिले गेले. यासह, विराट आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचाही गेली नऊ वर्ष कर्णधार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

फक्त ७ खेळाडूंनी केलंय टी२०मध्ये टीम इंडियाचं नेतृत्त्व, चक्क २ मुंबईकरांचा आहे यात समावेश

‘तो’ देवदूतासारखा धावला, नाहीतर आज क्रिकेटर नव्हे पाणेपाणी विकणारा असतो; युवा शिलेदाराचा खुलासा

बुडत्याचा पाय खोलात! टी२०चे नेतृत्त्वपद सोडणाऱ्या विराटला बीसीसीआयकडून मिळणार आणखी एक दणका

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---