ICC Test Cricketer of the Year: आज(25 जानेवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2023 वर्षांचे पुरस्कार घोषित केले आहेत. या पुरस्करांमधील वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा याला मिळाला आहे.
2004पासून सुरु झालेला हा पुरस्कार मिळवणारा ख्वाजा हा एकूण 19 वा क्रिकेटपटू ठरला आहे. तसेच सर्वोत्तम कसोटीपटूचा हा पुरस्कार मिळवणारा तो ऑस्ट्रेलियाचा 6 वा क्रिकेटपटू ठरला आहे.
याआधी ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग, मायकल क्लार्क, मिशेल जॉन्सन आणि स्टिव्ह स्मिथ यांना आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला आहे. यातील स्मिथने 2 वेळा हा पुरस्कार मिळवला आहे. अन्य सर्वांना प्रत्येकी 1 वेळा हा पुरस्कार मिळवता आला आहे.
ख्वाजा 2013 या वर्षातील कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने 13 कसोटी सामन्यात 1210 धावा केल्या आहेत. तसेच या वर्षात नाबाद 195 सर्वोत्तम खेळी आहे. (Complete list Cricketers who have been awarded the ICC Test Player of the Year till date)
ख्वाजाच्या आधी आयसीसीचा सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार 18 क्रिकेटपटूंनी मिळवला आहे. या क्रिकेटपटूंची ही यादी –
आयसीसी सर्वोत्तम कसोटीपटू पुरस्कार विजेते –
2004 – राहुल द्रविड
2005 – जॅक कॅलिस
2006 – रिकी पाँटिंग
2007 – मोहम्मद युसुफ
2008 – डेल स्टेन
2009 – गौतम गंभीर
2010 – विरेंद्र सेहवाग
2011 – ऍलिस्टर कूक
2012 – कुमार संगकारा
2013 – मायकल क्लार्क
2014 – मिशेल जॉन्सन
2015 – स्टिव्ह स्मिथ
2016 – आर अश्विन
2017 – स्टिव्ह स्मिथ
2018 – विराट कोहली
2019 – पॅट कमिन्स
2020 – स्टिव्ह स्मिथ
2021 – जो रूट
2022 – बेन स्टोक्स
2023 – उस्मान ख्वाजा
हेही वाचा
उस्मान ख्वाजाने जिंकला 2023 ‘आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार, ‘हा’ भारतीयही होता शर्यतीत
लाईव्ह सामन्यात घुसला विराटचा चाहता, घेतला रोहित शर्माचा आशिर्वाद, पाहा VIDEO