कतारमध्ये सुरू असलेल्या फीफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022चा अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात रविवारी (18 डिसेंबर) खेळला गेला. पेनल्टी शूटआउटपर्यंत ताणल्या गेलेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने विजय संपादन केला. फुटबॉल विश्वचषकात सर्वोत्तम गोलरक्षण करणाऱ्या गोलरक्षकास गोल्डन ग्लोव्हज पुरस्कार देण्यात येतो. पेनल्टी शूट आउट, अंतिम सामन्यात आणि संपूर्ण स्पर्धेदरम्यान सामन्यात आपला भक्कम बचाव करणारा अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझ (Emiliano Martinez) याला यंदाचा गोल्डन ग्लोव्हज पुरस्कार देण्यात आला.
There when it matters most 🇦🇷
Emi Martinez takes the @adidas Golden Glove Award! 🧤#FIFAWorldCup | #Qatar2022
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 18, 2022
या पुरस्काराची सुरूवात 1994मध्ये झाली. त्या पुरस्काराला आधी लेव्ह यशिन या रशियन गोलकीपरचे नाव दिले गेले होते, नंतर 2010मध्ये त्याला ‘गोल्डन ग्लोव्ह अवार्ड’ म्हटले जाऊ लागले.
यशिन यांची कामगिरी-
फिफानुसार, यशिन यांनी 1958 ते 1970 दरम्यान चार विश्वचषक खेळले. त्यांनी त्यांच्या व्यवसायिक कारकिर्दीत 150 पेक्षा अधिक पेनल्टी गोलचा बचाव केला. तसेच त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 270 क्लीन शीट राखल्या.
हा पुरस्कार फीफाचे तांत्रिक अधिकारी (टेक्निकल स्टडी टीम) संपूर्ण अभ्यास करून विजेते ठरवतात. त्याचबरोबर गोलकीपर हा गोल्डन बॉल पुरस्कारासाठीही पात्र असतो. 2002मध्ये जर्मनचा गोलकीपर ऑलिव्हर कान याने हे दोन्ही पुरस्कार जिंकले आहेत. या लेखामध्ये आपण आतापर्यंत कोणते खेळाडू गोल्डन ग्लोव्ह्जचे मानकरी ठरले याची यादी पाहुया.
टायब्रेकर
जर गोल्डन ग्लोव्ह पुरस्कारासाठी बरोबरी झाली, तर विजेता हा तो गोलकीपर असेल जो स्पर्धेत सर्वात पुढे गेला. आणखी टायब्रेकरची आवश्यकता असल्यास, ते सर्वाधिक बचाव केलेल्या आकडेवारीवर आधारित असेल, त्यानंतर खेळल्या गेलेल्या मिनिटांवर आधारित असेल. Complete list of Golden Gloves winners in the FIFA World Cup
वर्ष खेळाडू संघ/ देश सामने गोल कन्सीड क्लीन शीट
2018 थिबॉट कोर्टोइस बेल्जियम 7 6 3
2014 मॅन्युल नेयुर जर्मनी 7 4 4
2010 इकर कॅसिलस स्पेन 7 1 6
2006 जियानलुगी बफॉन इटली 7 2 5
2002 ऑलिव्हर कान जर्मनी 7 3 5
1998 फॅबियन बर्थेझ फ्रांस 7 2 5
1994 मिशेल प्रीउड’होम बेल्जियम 4 4 2
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयसीसीसोबतचा ‘हा’ वाद भारताला महागात पडणार! विश्वचषकाच्या यजमानपदासाठी मोजावे लागणार 900 कोटी
विश्वचषकात फीफा वाटणार तब्बल 3641 कोटी, विजेत्या संघासोबत इतर टीमवरही पडणार पैशांचा पाऊस