यावर्षी (2020) 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली गेली होती. परंतु कोरोनाव्हायरसच्या उद्रेकामुळे मार्च 2021 पर्यंत ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुढच्या वर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारतीय हॉकी संघ चांगली कामगिरी करेल असा विश्वास भारताचे क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांना आहे.
पुरुष आणि महिला संघ चांगली कामगिरी करेल याचा आत्मविश्वास – किरण रिजिजू
किरण रिजिजू यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून ट्विट केले की, “मी हे पूर्ण आत्मविश्वासाने आणि आशेने सांगत आहे की पुरुष आणि महिला हॉकी संघ टोकियो ऑलम्पिकमध्ये चांगली कामगिरी करेल. दोन्ही संघांचे खेळाडू खूप मेहनत घेत आहेत. आम्ही त्यांना उत्कृष्ट सुविधा आणि सेवा प्रदान करत आहोत.”
I'm saying it with full confidence and hopeful that both Men's and Women's Hockey team will do well in Tokyo Olympics. Our Boys and Girls are really working very hard. We are providing them top facilities and best support systems. https://t.co/izEytkEyC4
— Kiren Rijiju (मोदी का परिवार) (@KirenRijiju) November 3, 2020
सन 2019 मध्ये ऑलम्पिक पात्रता फेरीत मिळवला होता विजय
मागील वर्षी महिला आणि पुरुष या दोन्ही हॉकी संघांनी ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळविला होता. भुवनेश्वर येथे झालेल्या ऑलम्पिक पात्रता फेरीत त्यानी विजय मिळवला होता.
पुरुष संघाने रशियाचा, तर महिला संघाने अमेरिकेचा केला पराभव
दिग्गज हॉकीपटू मनप्रीत सिंगच्या नेतृत्वात पुरुष संघाने रशियाचा 11-3 ने सहजपणे पराभव केला होता. दुसरीकडे राणी रामपाल या महिला हॉकीपटूच्या नेतृत्वाखाली महिला हॉकी संघाने अमेरिकेचा 6-5 ने पराभव केला होता.