---Advertisement---

“आयपीएल २०२१ नंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडतो म्हणणाऱ्या विराटची अर्ध्यातच होईल हाकालपट्टी”

On: गुरूवार, सप्टेंबर 23, 2021 2:56 PM
Virat Kohli and Harshal Patel
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी आगामी टी२० विश्वचषकानंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर काही दिवसांच्या अंतराने त्याने दुसऱ्या मोठ्या निर्णयाची घोषणा करत पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे नेतृत्व करणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. विराट मागच्या काही दिवसांपासून खराब फाॅर्ममध्ये दिसत आहे. तसेच त्याला संघाच्या कर्णधाराच्या रूपातही यश मिळत नसल्याचे निदर्शनात आले आहे. अशात त्याच्या चाहत्यांना विराट पुढच्या वर्षीच्या ऐवजी याचवर्षी आरसीबीच्या कर्णधारपदावरून पायउतार झालेला दिसू शकतो.

आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्याच सामन्यात आरसीबीला पराभव पत्करावा लागला आहे. पहिल्या टप्प्यातील आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मोठ्या फरकाने पराभूत झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाने दुसऱ्या टप्प्यात त्याचा चांगला सूड घेतला आहे. केकेआरने आरसीबीला या सामन्यात अवघ्या ९२ धावांवर रोखले आणि सामन्यात ९ विकेट्स राखत विजय मिळवला.

या सामन्यात विराट अवघ्या ५ धावा करून बाद झाला होता. विराटच्या आणि संघाच्या खराब प्रदर्शनानंतर संघ व्यवस्थापन नाराज दिसत आहे. विराटला या हंगामाच्या अर्ध्यातूनच आरसीबीच्या कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

इतर संघांप्रमाणे कर्णधार बदलण्याचा घेतला जाऊ शकतो निर्णय
क्रिकट नेक्सटमधील एका वृत्तानुसार विराटला आरसीबीच्या कर्णधारपदावरून अर्ध्यातूनच हटवले जाऊ शकतेय एका माजी क्रिकेटपटूने याबाबत त्याचे मत व्यक्त केले आहे.

ते म्हणाले, “पाहा, तो कशाप्रकारे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळत होता. फक्त अज्ञात! असे वाटत होते की, तो यावेळी खूप संघर्ष करत आहे. अशी आशंका आहे की, त्याला हंगामाच्या मध्येच नेतृत्त्वपदावरुन हटवले जाऊ शकते. हे आधीही अन्य संघांसोबत झाले आहे, जसे की केकेआरमध्ये दिनेश कार्तिक आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये डेविड वार्नर. त्यांना हटवले गेले किंवा ते स्वत: रस्त्यातून हटले आहेत. हे आरसीबीमध्येही होऊ शकते. केकेआर आणि आरसीबी यांच्यातील सामना पाहून मला असे वाटते की, आणखी एक खराब खेळ आणि तुम्हा तत्काळ आरसीबीच्या कर्णधारपदामध्ये बदल पाहू शकता.”

कोहलीनंतर आरसीबीचे कर्णधार बनू शकतात हे खेळाडू
विराट कोहली जर कर्णधारपदावरू पायउतार झाला किंवा त्याला हटवले गेले’ तर भविष्यात संघाच्या कर्णधारपदासाठी एबी डिव्हिलियर्स प्रमुख दावेदार असेल. मात्र, हा निर्णय त्याच्यावर असेल की, तो संघाचा कर्णधार बनू इच्छित आहे की नाही?.  डिव्हिलियर्सनंतर संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलचे नाव कर्णधारपदासाठी पुढे येत आहे. चहलने आयपीएमध्ये आरसीबीसाठी सर्वाधिक १०६ सामन्यात १२५ विकेट्स घेतल्या आहेत. संघासाठी युवा कर्णधाराच्या शर्यतीत देवदत्त पडिक्कलचेही नाव चर्चेत आहे. त्याने मागच्या काही काळात आरसीबीसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

फलंदाजीत फ्लॉप, त्यात विनाकामी रिव्ह्यूही घालवला वाया; नेटकऱ्यांनी केदारची उडवली खिल्ली

रोहितसोबत व्हिडिओ कॉलवर बोलण्याची संधी; पण तो म्हणाला, ‘देवासोबत कोण बोलतं’, पाहा भावनिक प्रसंग

लाईव्ह सामन्यात पंतमुळे फुटलं असतं कोणाचं तरी डोकं, पठ्ठ्यानं केलीच अशी करामत; बघा VIDEO

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---