---Advertisement---

लाईव्ह सामन्यात पंतमुळे फुटलं असतं कोणाचं तरी डोकं, पठ्ठ्यानं केलीच अशी करामत; बघा VIDEO

On: गुरूवार, सप्टेंबर 23, 2021 2:06 PM
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये बुधवारी (२२ सप्टेंबर) रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात युवा रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने अनुभवी केन विलियमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघावर ८ गडी राखून विजय मिळवला. यासह आयपीएल २०२१ स्पर्धेच्या गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान गाठले आहे.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार रिषभ पंत चांगल्याच लयीत दिसून येत होता. परंतु सामन्याच्या शेवट लवकर झाल्याने त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. त्याला नाबाद ३५ धावांची खेळी करण्यात यश आले. दरम्यान फलंदाजी करत असताना रिषभ पंत सोबत असा काही प्रकार घडला होता, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार रिषभ पंत आपल्या आगळ्या वेगळ्या फलंदाजी शैलीसाठी प्रसिद्ध आहे. तो नेहमीच आगळे वेगळे शॉट खेळून सर्वांनेच आश्चर्यचकित करत असतो. अशातच सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील त्याने आगळा वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता.

रिषभ पंतसारखा फलंदाज जास्त वेळ शांत राहू शकत नाही. ७ चेंडुंमध्ये ७ धावांवर फलंदाजी करत असताना त्याला एक चौकार मारता आला होता. त्यामुळे त्याने १५ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या राशिद खानच्या गोलंदाजीवर मोठे फटके खेळण्याचा विचार केला होता. या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर त्याने मोठा फटका खेळण्यासाठी जोरदार बॅट फिरवली. परंतु चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क झाला नाही. तो चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात गेला आणि तितक्यात ती बॅट देखील रिषभ पंतच्या हातातून सुटली.

बॅट त्याने इतक्या जोरात फिरवली होती की, ती मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत असलेल्या केन विलियमसन जवळ गेली होती. त्यानंतर विलियमसनने ती बॅट रिषभ पंतला आणून दिली होती. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

https://twitter.com/SportsHustle3/status/1440725183539466246?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1440725183539466246%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-41431785703194947968.ampproject.net%2F2109102127000%2Fframe.html

दिल्ली कॅपिटल्स संघाचा ८ गडी राखून विजय 
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु हा निर्णय पूर्णपणे फ्लॉप ठरला. सनरायझर्स हैदराबाद संघातील एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. या डावात अब्दुल समदने सर्वाधिक २८ धावांची खेळी केली. तर राशिद खानने २२ धावांचे योगदान दिले.या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाला २० षटकअखेर ९ बाद १३४ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून श्रेयस अय्यरने नाबाद ४७ आणि शिखर धवनने ४२ धावांचे योगदान दिले. हा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाने ८ गडी राखून आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या-

दिल्ली पुन्हा नंबर १, पण हैदराबाद जवळजवळ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; पाहा गुणतालिकेची सद्यस्थिती

अवघ्या १८ धावा करूनही साहाचा खास विक्रम, ओलांडला ‘इतक्या’ हजारांचा टप्पा

दिल्लीचा हैदराबादवर दणकेबाज विजय; आनंदाने कर्णधार पंत म्हणाला, ‘आमचे प्रशिक्षक नेहमी सांगतात…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---