---Advertisement---

दिल्ली पुन्हा नंबर १, पण हैदराबाद जवळजवळ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; पाहा गुणतालिकेची सद्यस्थिती

On: गुरूवार, सप्टेंबर 23, 2021 1:01 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेतील ३३ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. यासह आयपीएल स्पर्धेच्या गुणतालिकेत त्यांनी अव्वल स्थान देखील गाठले आहे. चला तर पाहूया आयपीएल २०२१ स्पर्धेच्या गुणतालिकेची सद्यस्थिती.

दिल्ली कॅपिटल्स संघ सर्वोच्च स्थानी 
आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत रिषभ पंतला दिल्ली संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. ही जबाबदारी त्याने योग्यरीत्या पार पाडली आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अप्रतिम कामगिरी केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात देखील या संघाची अप्रतिम कामगिरी सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने या स्पर्धेत एकूण ९ सामने खेळले आहेत. त्यांपैकी त्यांना ७ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे तर २ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ सध्या १४ गुणांसह अव्वल स्थानी आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाला या स्पर्धेत प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघ तळाशी
सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात निराशाजनक कामगिरी केली होती. हीच कामगिरी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात देखील सुरू आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेच्या गुणतालिकेत सनरायझर्स हैदराबाद संघ २ गुणांसह सर्वात शेवटी आहे. या संघाने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना एकाच सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर ७ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ज्यामुळे त्यांचा प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग कठीण झाला आहे.

तसेच दिल्ली कॅपिटल्स संघानंतर चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल २०२१ स्पर्धेच्या गुणतालिकेत १२ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ १० गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. तसेच ५ वेळेस आयपीएल स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्स संघ ८ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. या सर्व संघांमध्ये प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी स्पर्धा पाहायला मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या-

गुणतालिकेत तळाशी असलेल्या हैदराबादचा पुन्हा ‘सनसेट’, हताश कर्णधाराने ‘यांच्या’वर फोडले खापर

लाईव्ह सामन्यात ‘तिला’ पाहून दर्शकांची खुलली कळी; म्हणाले, ‘सनरायझर्सला सपोर्ट करण्याचं एकमेव कारण’!

अरे किती घाई! स्टंपिगच्या गडबडीत पंतकडून सुटला विलियम्सनचा झेल, गोलंदाज अश्विननं मुरडलं नाक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---