भारताच्या ७४व्या स्वातंत्र्यदिनी भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने निवृत्तीची घोषणा करुन ४० मिनीटंही झाली नाही, तोच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच दोन क्रिकेटरने एकाच दिवशी ४० मिनीटांच्या गॅपने निवृत्तीची घोषणा केली असावी.
रैनाच्या अचानक क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या निर्णयामुळे सर्वजण थक्क झाले आहेत. कारण, सर्वांना वाटत होते की, रैना आयपीएल २०२०मध्ये दमदार प्रदर्शन करत पुढील वर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकातून भारतीय संघात शानदार पुनरागमन करेल. पण, अचानक रैनाने धोनीपाठोपाठ आपल्या निवृत्ती घोषणा केली आणि पुनरागमनाच्या चर्चांवर विराम लावला.
“माही, तुझ्यासोबत खेळणे हा एक चांगला प्रवास होता. अतिशय अभिमानाने मी तुझ्यासोबत माझ्याही निवृत्तीची घोषणा करत आहे,” अशी पोस्ट करत रैनाने त्याच्या निवृत्तीची माहिती दिली. रैनाच्या निवृत्तीनंतर मोठमोठ्या क्रिकेटपटूंनी सोशल मीडियाद्वारे त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. Sachin Tendulkar And Virat Kohli Tweet On Suresh Raina Retirement From International Cricket
रैनाच्या निवृत्तीबाबत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ट्विट करत म्हटले की, “तुझ्या शानदार आंतरराष्ट्रीय कारकिर्दीसाठी तुझे अभिनंदन. मला अजूनही तुझ्या कसोटी पदार्पणाच्या सामन्यातील आपली मैदानावरील चर्चा आणि भागिदारी आठवण आहे. तुझ्या भविष्यासाठी तुला शुभेच्छा.”
जुलै २०१०मध्ये श्रीलंकाविरुद्ध रैनाने त्याचे कसोटी पदार्पण केले होते आणि पदापर्णाच्या सामन्यातच रैनाने सचिनसोबत मिळून २५६ धावांची भागिदारी केली होती. यात सचिनच्या १३६ धावांचा समावेश होता. तर, रैना १२० धावांवर बाद झाला होता.
Congratulations, Suresh on a wonderful career playing 🏏 for India.
Still remember our partnership & on-field conversations during your debut Test!
Wish you all the very best for your future endeavours. pic.twitter.com/kyhczi2juE
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 15, 2020
सचिनव्यतिरिक्त भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही ट्विट करत लिहिले की, “टॉप कारकिर्दीसाठी तुझे अभिनंदन भावेश. भविष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी गुड लक.”
Congratulations on a top career Bhavesh. Goodluck with everything ahead 😊👍 @ImRaina
— Virat Kohli (@imVkohli) August 15, 2020
रैना भारताकडून १८ कसोटी, २२६ वनडे व ७८ टी२० सामने खेळला असून २०११ विश्वविजेत्या भारतीय संघाचा तो भाग होता. रैनाने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १७ जुलै २०१८ रोजी इंग्लंडविरुद्ध खेळला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीच्या रिटायरमेंटच्या नादात लोकं रैनाची रिटायरमेंट विसरले, माजी क्रिकेटरने ट्विटर करत…
धोनीची ज्या गिलख्रिस्टशी कायम तुलना झाली; तोही भावुक होतं म्हणतोय, मित्रा…
तामिळनाडूचे लोकं कधीच धोनीला विसरणार नाहीत, तो रिटायर झाल्यानंतरही…
ट्रेंडिंग लेख –
बहती हवा सा था वो, उड़ती पतंग सा था वो
५ असे गोलंदाज, ज्यांनी धोनीला करु दिल्या नाहीत शेवटच्या ओव्हरमध्ये धावा
‘कॅप्टन कूल’ धोनीमुळे टीम इंडियाला मिळाले हे ५ हिरे, आज क्रिकेटमध्ये आहे त्यांचाच दबदबा…