पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या आठव्या टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) भारतीय संघ जाहीर झाला आहे. 15 जणांच्या या संघामध्ये रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. तसेच चार खेळाडूंना राखीव स्वरूपात संघात घेतले आहे. ऑस्ट्रेलियाची परिस्थिती पाहता भारतीय संघनिवडकर्त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र, आता या संघनिवडीवरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड झाल्यानंतर काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने निवडकर्त्यांवर टीका केली. निवडकर्त्यांवर नाराजी व्यक्त करत उत्तर प्रदेशच्या किशनगंज जिल्ह्यातील बहादूरगंज विधानसभेचे माजी आमदार तौसीफ आलम यांनी संघाच्या निवडीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.जोपर्यंत भारतीय संघाची निष्पक्ष निवड होत नाही तोपर्यंत मी क्रिकेट पाहणार नाही, असे तौसीफ आलम यांनी फेसबुकवर पोस्ट करताना लिहिले आहे.
त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, सोमवारी भारतीय संघाची टी20 विश्वचषकासाठी निवड झाली.निवडकर्त्यांच्या निर्णयाने मला धक्का बसला आहे. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, खलील अहमद यांसारख्या खेळाडूंचा संघात समावेश न होणे आश्चर्यकारक होते. भारतीय संघाची निष्पक्ष निवड होईपर्यंत मी क्रिकेट पाहणार नाही.
मागील काही दिवसांपासून अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी व फलंदाज संजू सॅमसन यांना संघात जागा मिळणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, त्यांना मुख्य संघात जागा मिळाली नाही. शमी हा संघासह ऑस्ट्रेलियाला जाईल मात्र तो राखीव खेळाडूंमध्ये समाविष्ट आहे.
टी20 विश्वचषकासाठी निवडला गेलेला भारतीय संघ–
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू- श्रेयस अय्यर, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई व दीपक चहर
महत्वाच्या बातम्या-
किती गोडंय! आशिया चषकाच्या फायनलदरम्यान दिसली ‘मिस्ट्री गर्ल’, क्यूटनेसने वेधले लक्ष
भारताकडून 15 वर्षांनंतर पुन्हा टी20 विश्वचषकात उतरणार ‘ही’ जोडी, एकटा जबरदस्त फॉर्मात