सध्या क्रिकेटचा महाकुंभमेळा म्हणजेच आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा सुरू आहे. यादरम्यान देशभरात दिवाळी सणही साजरा केला जात आहे. अशातच अफगाणिस्तान संघाचा स्टार फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज याने दिवाळीचे औचित्य साधून असे काही केले, ज्यानंतर त्याची भारतभर चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनीही त्याची दखल घेत कौतुकाचा वर्षाव केला.
गुरबाजने काय केलं?
खरं तर, रहमानुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) हा दिवाळीच्या दिवशी अहमदाबादच्या रस्त्यांवर राहणाऱ्या लोकांना पैसे वाटताना दिसला. त्याचे हे सुरेख काम पाहून शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी सोशल मीडियावर त्याच्या कौतुकाचे पूल बांधले.
दिवाळीच्या रात्री जवळपास 3 वाजता अफगाणिस्तानचा फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज अहमदाबादच्या रस्त्यांवर झोपलेल्या लोकांना पैसे वाटू लागला. एका स्थानिक रहिवाशाने व्हिडिओ शेअर केला, ज्यावर काँग्रेस नेते शशी थरूरही व्यक्त झाले. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, “आपल्या अखेरच्या सामन्यानंतर अफगाण फलंदाजाने रस्त्यांवर राहणाऱ्या लोकांसाठी केलेले एक दयाळू कार्य. त्याने आतापर्यंत जितकेही शतक केले आहेत, हे त्यापेक्षा खूप जास्त आहे. त्याची कारकीर्दही त्याच्या हृदयासारखी दीर्घ काळ बहरत राहो.”
https://twitter.com/ShashiTharoor/status/1723763073033343092?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1723763073033343092%7Ctwgr%5E84fe4f48d8b4d1a6ea0084838b92a402b17fa1ce%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.amarujala.com%2Findia-news%2Fcongress-leader-shashi-tharoor-reacts-on-afghan-batter-rahmanullah-gurbaz-kind-gesture-in-ahmedabad-2023-11-13
अहमदाबादच्या एका व्यक्तीने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसते की, अफगाणी फलंदाज रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांच्या जवळ पैसे ठेवत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सने एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी गुरबाजला जानी म्हटले. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले, “या महिन्यात अफगाणिस्तानमध्ये आलेल्या भूकंपानंतर पीडितांसाठी पैसे गोळा करण्यापासून ते परदेशात अशाप्रकारचे दयाळू कार्य, तू आम्हा सर्वांना प्रेरित करतोस. परमेश्वराचा आशीर्वाद सदैव तुझ्यावर राहो.”
https://twitter.com/KKRiders/status/1723580026531279325
अफगाणिस्तानचा प्रवास संपुष्टात
भारतात खेळल्या जात असलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेत अफगाणिस्तानचा प्रवास संपुष्टात आला आहे. संघाने या स्पर्धेत चांगले प्रदर्शन केले. मात्र, त्यांना उपांत्य फेरीत जागा मिळवण्यात अपयश आले. त्यांनी 9 पैकी 4 सामने जिंकले. अफगाणिस्तानने इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेदरलँड्स या संघांचा पराभव केला. तसेच, ऑस्ट्रेलियासारख्या संघालाही चांगलेच आव्हान दिले. (congress leader shashi tharoor reacts on afghanistan batsman rahmanullah gurbaz kind gesture in ahmedabad 2023)
हेही वाचा-
पाकिस्तानी खेळाडूची राहुलविषयी ‘ही’ प्रतिक्रिया वाचून प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान; म्हणाला, ‘जगातील…’
‘गृहमंत्री असलेल्या वडिलांमुळे जय शाह शक्तिशाली, श्रीलंका क्रिकेट बर्बाद केलं…’, माजी कर्णधाराचा गंभीर आरोप