---Advertisement---

“संजू तो संजू है”, शशी थरूर यांच्या ‘त्या’ प्रतिक्रियेनंतर गौतमचं ‘गंभीर’ ट्विट

---Advertisement---

आयपीएलच्या १३ व्या हंगामातील नववा सामना रविवारी (२७ सप्टेंबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात झाला. हा सामना राजस्थान संघाने ४ विकेट्सने जिंकला. हा राजस्थानचा सलग दुसऱ्या सामन्यातील दुसरा विजय होता.

नाणेफेक जिंकून राजस्थान संघाने पंजाबला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यादरम्यान पंजाबने केवळ २ विकेट्स गमावत २२३ धावांचा डोंगर उभा केला होता. पंजाबच्या २२४ धावांचे आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या राजस्थान संघाने केवळ १९.३ षटकातच ६ विकेट्स गमावत पंजाबचे आव्हान पूर्ण केले. राजस्थानच्या विजयात संजू सॅमसनने चमकदार योगदान दिले. त्याने ४२ चेंडूत ४ चौकार आणि तब्बल ७ षटकारांच्या मदतीने ८५ धावांची तडाखेबंद खेळी केली.

या खेळीनंतर त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहेे. यामध्ये अनेक दिग्गजांनी आपली मते व्यक्त केली. त्यात काँग्रेस पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांचाही समावेश आहे.

शशी यांनी सॅमसनचे कौतुक करत ट्वीट केले की, “राजस्थान रॉयल्स संघासाठी काय अविश्वसनीय विजयी खेळी केलीय. मला माहित आहे. मी संजू सॅमसनला एका दशकापासून ओळखतोय. तो १४ वर्षांचा असताना मी त्याला सांगितले होते की, तो एके दिवशी दुसरा एमएस धोनी बनेल. तो दिवस म्हणजे हाच. या आयपीएलमधील त्याच्या दोन आश्चर्यकारक खेळीनंतर तुम्हाला माहिती आहे की जागतिक दर्जाचा खेळाडू आला आहे.”

https://twitter.com/ShashiTharoor/status/1310282432663318529

शशी यांच्या या ट्वीटवर भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि सध्याचा खासदार गौतम गंभीरने चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. गंभीरने ट्वीट केले की, “संजू सॅमसनला पुढील कोणीही होण्याची गरज नाही. तो भारतीय क्रिकेटचा ‘द’ संजू सॅमसन असेल.”

सोबतच एस श्रीसंतनेही ट्वीट करत म्हटले आहे की, सॅमसन पुढचा धोनी नाही. तो संजू सॅमसन आहे. तो २०१५ पासून नियमितपणे सर्व क्रिकेट प्रकारात खेळत आहे. कृपया करून त्याची इतर कोणाशीही तुलना करू नका. जर त्याला योग्य संधी दिली, तर तो अशाचप्रकारे भारतीय संघासाठी खेळेल आणि विश्वचषकही जिंकून देईल.

शशी थरूर हे क्रिकेटप्रेमी आहेत. त्यांनी क्रिकेटच्या अनेक कार्यक्रमात भाग घेतला आहे. ते क्रिकेटच्या सामन्याआधी किंवा सामन्यानंतर ट्वीट करताना दिसतात. ते आपल्या कठीण इंग्रजी शब्दांनी क्रिकेटच्या चाहत्यांना गोंधळात टाकतात. ते खऱ्या अर्थाने एक अष्टपैलू आहेत. विशेष म्हणजे ते केरळचे असून संजू सॅमसनही केरळचा आहे.

सॅमसनने आतापर्यंत आयपीएलमध्ये ९५ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २८.८८ च्या सरासरीने २३६८ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने २ शतके ठोकली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-‘तो सभ्य आणि शांत, दुसरा कोणी असता तर…’, सेहवागने व्यक्त केले रोखठोक मत

-दिनेश कार्तिकचं नेतृत्व धोक्यात? ‘या’ खेळाडूला कर्णधार करण्याची जोरदार मागणी

-७ षटकारांची बरसात केलेल्या राहुल तेवतियाने केली सॅमसन, राणाची बरोबरी

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएलमध्ये सर्वात वेगवान २ हजार धावा करणारे ३ भारतीय फलंदाज

-३ सलामीवीर जे या आयपीएल हंगामात करु शकतात खालच्या क्रमांकावर फलंदाजी

-असे २ भारतीय फलंदाज, ज्यांनी वयाची २१ वर्षे पूर्ण करण्याआधीच आयपीएलमध्ये ठोकलेत सर्वाधिक अर्धशतके

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---