सध्या इंग्लंडमध्ये टी२० ब्लास्ट स्पर्धा सुरू आहे. यामध्ये इंग्लंडचा क्रिकेटपटू लियाम लिविंगस्टोनने त्याचा आयपीएलमधील (इंडियन प्रीमियर लीग) फॉर्म कायम राखत धमाकेदार फलंदाजी केली आहे. मागेच त्याने यॉर्कशायर विरुद्धच्या सामन्यात मारलेला षटकार पाहून तो स्वत:हाच हैराण झाला होता. आता पुन्हा एकदा त्याने असाच काही षटकार मारला आहे.
लंकाशायरकडून खेळणाऱ्या लिविंगस्टोनने पुन्हा एकदा स्फोटक फलंदाजी केली आहे. बुधवारी (१ जून) डर्बीशायर विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ४० चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकार मारत ७५ धावांची खेळी केली आहे. यावेळी त्याने मारलेला एक षटकार स्टेडियमच्या बाजूला पडला असता कर्मचाऱ्यांनी चेंडूची शोधाशोध सुरू केली. या षटकाराचा व्हिडीओ टी२० ब्लास्टने त्यांंच्या अधिकृत ट्विटरवर पोस्ट केला आहे.
लिविंगस्टोनने मार्क वॅटच्या ८.२ षटकात टाकलेला चेंडू इतक्या जोरात मारला की, तो स्टेडियमच्या बाजूला कन्ट्रक्शनचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पडला. त्यावेळी तेथील कामगार आणि कर्मचारी यांनी मिळून चेंडू शोधण्याची मोहिम हातात घेतली.
Liam Livingstone is starting to tee off! 💥
Watch him bat LIVE ➡️ https://t.co/fvUbVrnZuz#Blast22 pic.twitter.com/tl6iEYZzZN
— Vitality Blast (@VitalityBlast) June 1, 2022
या सामन्यात लंकाशायरचा कर्णधार डेन विलासने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. त्यावेळी लिविंगस्टोनच्या ७५ धावा सर्वोत्तम धावा ठरल्या. त्यांनी २० षटकात ६ विकेट्स गमावत २१९ धावा केल्या. प्रत्युत्तरात डर्बीशायरकडून लुईस रीसेने ५५ धावा केल्या. तर ल्यूस डू प्लूयने ३१ चेंडूत नाबाद ५९ धावा केल्या. पण त्याची ही एकाकी झुंज कामी आली नाही. हा सामना लंकाशायरने १७ धावांनी जिंकला.
आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळणारा लिविंगस्टोन २०२२च्या आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अकराव्या क्रमांकावर राहिला. त्याने १४ सामन्यांत ४३७ धावा केल्या आहेत. तर टी२० ब्लास्टच्या ४ सामन्यांत त्याने १५४ धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvsSA| भारतीय संघाच्या निशाण्यावर वर्ल्ड रेकॉर्ड, टी२०त अशी किमया साधणारा बनेल पहिलाच संघ
INDvsSA। आयपीएलमधील चमकदार कामगिरीनंतर फळफळले मिलरचे नशीब; दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने आखला प्लॅन
IPL 2022| जडेजाची १ विकेट ३.२ कोटीला, तर चौधरीने करून दिले पैसे वसूल, पाहा महागडे आणि स्वस्त गोलंदाज