ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच याने वनडे क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या रविवारी म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध होणारा सामना आपला अखेरचा वनडे सामना असेल असे त्याने घोषित केले. मागील काही काळापासून सातत्याने खराब कामगिरी होत असल्याने त्याने हा निर्णय घेतल्याचे बोलले जातेय. मात्र, त्यानंतर त्याचा उत्तराधिकारी कोण असेल? याबाबत देखील चर्चा रंगू लागल्या आहेत.
स्टीव्ह स्मिथ
ऑस्ट्रेलियाच्या वनडे कर्णधारपदाच्या शर्यतीत माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याचे नाव आघाडीवर आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केलेल्या स्मिथला 2018 सॅंडपेपर प्रकरणानंतर कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले होत. तसेच पुढील दोन वर्ष त्याला राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करण्यास मनाई केली गेलेली. आता त्याच्यावरील ही बंदी उठली असून, आपल्या पूर्वीच्या अनुभवाच्या जोरावर तो पुन्हा एकदा राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो.
पॅट कमिन्स
अनुभवी वेगवान गोलंदाज व कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स हा देखील वनडे संघाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम पर्याय म्हणून पुढे येतोय. कसोटी संघाचा कर्णधार असल्याचा फायदा त्याला मिळू शकतो. कमिन्स नियमितपणे ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळत असल्याने, त्याला वनडे संघाची देखील जबाबदारी दिली जाऊ शकते.
ऍलेक्स केरी
ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या निवडसमिती ज्या नावासाठी आग्रही आहे ते नाव यष्टीरक्षक ऍलेक्स केरीचे आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यावर फिंच व कमिन्सच्या अनुपस्थितीत त्याने संघाचे नेतृत्व केलेले. तो सध्या 31 वर्षाचा असल्याने चार-पाच वर्षे तो संघाचे नेतृत्व करू शकतो.
ग्लेन मॅक्सवेल
या सर्वांना अपेक्षितपणे जे नाव समोर येऊ शकते ते म्हणजे अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याचे. मॅक्सवेल हा मर्यादित षटकांच्या संघाचा प्रमुख सदस्य आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तगडा अनुभव असलेला मॅक्सवेल फ्रॅंचाईजी क्रिकेटमध्ये संघांचे नेतृत्व देखील करतो. याच कारणाने त्याची कर्णधारपदी वर्णी लागल्यास आश्चर्य वाटायला नको.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकातून निराशा घेऊन टीम इंडिया भारतात! आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर असेल खास लक्ष्य
टी20 विश्वचषकासाठी नेहराने निवडला भारताचा संघ, टीमबाहेर असलेल्या ‘या’ गोलंदाजाला संधी
कोहलीचा क्लास गांगुलीपेक्षा वरचढं! खुद्द ‘दादा’नेच केलं स्पष्ट






