---Advertisement---

‘नगमा अन् दादाच्या अफेरबद्दल सर्वकाही माहितय,’ म्हणत प्रसिद्ध लेखकाकडून बायोपिकची स्टोरी लिहिण्याची इच्छा व्यक्त

On: शुक्रवार, जुलै 16, 2021 4:13 PM
---Advertisement---

चित्रपट आणि गाण्यांचा आढावा देण्यासाठी त्याच बरोबर आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले कमलराव खान अर्थात केआरके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रोज केआरके बॉलिवूड अभिनेता आणि त्यांच्या चित्रपटांबद्दल काही-ना-काही चर्चा करीत असतात. आपल्या वक्तव्यांवरून त्यांच्यावर सतत टीका होत असली तरीही ते आपले वादग्रस्त वक्तव्य करण्याचे थांबत नाहीत. यावेळेस केआरकेने कोणत्याही अभिनेत्याबद्दल नाही तर भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुलीबद्दल वक्तव्य केले आहे.

महत्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वी अशी बातमी हाती आली होती की, गांगुलीच्या जीवनावर चित्रपट तयार होणार आहे. भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार सौरव गांगुलीची मुख्य भूमिका बॉलिवूड स्टार अभिनेता रणबीर कपूर निभावणार आहे.

याचदरम्यान केआरकेने आपले मत मांडले आहे. गांगुलीच्या जीवनावरील चित्रपटासाठी त्यांच्याशिवाय दुसरे कोणीही उत्कृष्ट कथा देऊ शकत नाही. कारण आपल्याला गांगुलीची सर्वच गुपिते माहिती आहे, असे केआरकेचे म्हणणे आहे.

केआरकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘सौरव गांगुलीच्या जीवनावर बनणाऱ्या चित्रपटामध्ये कथा लिहिण्यासाठी मी जगातील सर्वोत्कृष्ट लेखक आहे. कारण मला गांगुली आणि अभिनेत्री नगमा यांच्या प्रेमकथेची सर्व रहस्ये माहित आहेत. माझी मैत्रीण नगमाने मला सर्वकाही सांगितले आहे. म्हणून जर निर्मात्यांनी चित्रपटात चुकीच्या गोष्टी दाखवल्या तर मी त्यांना शून्य देईन.’

केआरकेच्या या ट्विटनंतर अनेक क्रिकेट चाहत्यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर तो फेकू आहे असेही काहींनी म्हटले आहे. याव्यतिरिक्त काही चाहत्यांनी केआरकेला देशद्रोही 2 लिहिण्याचा सल्ला दिला आहे. अशा प्रकारचे अनेक वादग्रस्त वक्तव्य केआरके नेहमी करत असतात. त्यामुळेच ते टीकाकारांच्या तावडीत सापडतात.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताच्या श्रीलंका दौऱ्यातील मालिकांच्या तारखांनंतर आता वेळेतही झाला बदल, पाहा किती वाजता सुरु होणार सामने

जबरदस्त! इंग्लंडच्या सलामीवीरने जोखीम घेत स्टंपजवळून मारला भन्नाट शॉट अन् चेंडू सीमारेषेपार

जवळचा भिडू असूनही ‘हा’ क्रिकेटर कुलदीपला म्हणाला, ‘…तर चापट खाशील’; व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---