ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याने नुकत्याच झालेल्या पॅलेस्टाईन वादावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. उस्मान ख्वाजाच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी शेफिल्ड शिल्डमध्ये खेळताना त्याच्यामध्ये प्रेरणेचा खूप अभाव होता. मात्र, गाभा येथील व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यानी पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
वास्तविक, पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बुटावर खास संदेश लिहून मैदानात उतरायचे होते, त्यासाठी आयसीसीने त्याला परवानगी दिली नाही. यानंतर तो काळी पट्टी बांधून मैदानात उतरला. त्याचवेळी दुसऱ्या टेस्टमध्ये ख्वाजाला त्याच्या बॅट आणि शूजवर ब्लॅक डव्ह लोगो लावायचा होता. यासाठी त्याला आयसीसीने परवानगी नाकारली होती. मात्र, आयसीसीकडून परवानगी न मिळाल्याने ख्वाजाने दुसरा मार्ग निवडला आणि बॉक्सिंग डे टेस्ट मॅचमध्ये आपल्या बुटांवर आयशा आणि आयला या मुलींची नावे लिहून फलंदाजीसाठी उतरला.
आता या सगळ्यावर उस्मान ख्वाजाने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “मी या गोष्टी अचानक केल्या नाहीत, तर त्याचा प्रभाव माझ्यावर बऱ्याच काळापासून पडला आहे. कसोटी मालिकेपूर्वी मी शेफिल्ड शील्ड क्रिकेट खेळत होतो त्यावेळी माझ्याकडे प्रेरणा नव्हती. मी माझी पत्नी राहेलशी याबद्दल बोललो आणि नंतर आमच्या क्रीडा मानसशास्त्रज्ञाशीही बोललो. मी त्यांना सांगितले की, माझ्याकडे प्रेरणा खूप कमी आहे. जेव्हा मी निरपराध मुलांना मारताना पाहिले तेव्हा त्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला. या कारणास्तव आता फक्त क्रिकेट खेळणे माझ्यासाठी महत्त्वाचे राहिलेले नाही. मी काय करू शकतो याचा खूप विचार केला आणि मग मी ते केले.” (Controversial Usman Khawaja’s Big Reaction Says When I Kill Innocent Children)
हेही वाचा
शोध घेण्यासाठी बेस्ट ‘जासूस’ कामावर लावा! वॉर्नरच्या बॅगी ग्रीन कॅपसाठी दिग्गजाचा ऑस्ट्रेलिया सरकारला सल्ला
IND vs SA: टीम इंडियाच्या इज्जतीचा प्रश्न; दुसऱ्या कसोटीत रोहित शर्माला ‘हा’ निर्णय घेणे पडू शकते भाग