कितीही नाव कमवा, कितीही मोठं पद मिळवा, आलिशान गाड्यांमधून फिरा, मोठमोठ्या पार्ट्या करा, पण या सगळ्या गोष्टी करताना जर तुम्ही एकदा का वादात अडकलात की मग तुमच्या करिअरचा आलेख खालच्या दिशेने बऱ्याचदा येतो. क्रिकेट विश्वातही असाच एक दिग्गज होता, जो जगातील सर्वोत्तम फिरकीपटू म्हणून ओळखला जातो. जगातील कितीही विस्फोटक क्रिकेटर असूद्या, आपल्या गोलंदाजी कौशल्याने शेन वॉर्न त्याला तंबूत धाडायचा. मैदानावरील ‘फिरकीचा जादूगार’ असलेला याच वॉर्नची दुसरीही बाजू होती. ती म्हणजे वाद. त्याची सर्वाधिक चर्चा ही, त्याच्या आयुष्यातील वादग्रस्त किस्स्यांमुळेच होते. कोणते होते ते वाद, ज्याने वॉर्नच्या आयुष्यात त्सुनामी आणली. हेच आपण आज या लेखातून पाहणार आहोत.
१३ सप्टेंबर, १९६९ रोजी ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरियात जन्मलेल्या वॉर्नने अनेकदा त्याच्या संघाला संकटातून बाहेर काढलेलं. इतकंच नाही, तर किताबही पटकवून दिला. कसोटी आणि वनडे असे मिळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १००१ विकेट्स घेणाऱ्या वॉर्नच्या वादाकडे वळूया…
मॅच फिक्सिंगच्या आरोपात अडकलेला वॉर्न
हा किस्सा होता, १९९४ सालचा जेव्हा श्रीलंका दौऱ्यात त्याच्यावर एका भारतीय बुकीकडून देवाण-घेवाणीचा आरोप लावण्यात आलेला. त्याच्यावर असा आरोप होता की, त्याने बुकीला खेळपट्टीची आणि हवामानाच्या परिस्थितीची माहिती दिली होती. या प्रकरणात त्याचा संघसहकारी आणि दिग्गज माजी फलंदाज मार्क वॉलाही आरोपी ठरवण्यात आलेलं.
वॉर्नवरील दुसरा वाद म्हणजे प्रतिबंधित पदार्थाच्या सेवनाचा
२००३ च्या आयसीसी विश्वचषकादरम्यान ‘फिरकीचा जादूगार’ वॉर्न डोप टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलेला. आता डॉप टेस्टमध्ये आढळला म्हणजे कारवाई तर होणारच होती. झालंही तसंच. या कारणामुळे त्याला थेट विश्वचषकातूनच डच्चू देण्यात आलेला. त्यानंतर त्यानेही मान्य केले होते की, त्याने तापाच्या गोळ्या घेतलेल्या. त्याचं म्हणणं होतं की, त्याने त्या गोळ्या त्याच्या आईच्या सांगण्यावरून घेतल्या होत्या. यानंतर त्याच्यावर एक वर्षाची बंद घालण्यात आलेली.
वॉर्नबाबत आणखी मोठा वाद म्हणजे त्याचे महिलांसोबतचे संबंध
क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजांच्या नाकी नऊ आणणाऱ्या वॉर्नवर महिलांसोबतच्या संबंधाचे अनेक आरोप लागले होते. या घटनेनंतर २००७ साली तो पत्नीसोबत वेगळे झाल्याच्या बातम्यांनीही जोर धरला होता. मात्र, काही दिवस ते एकत्र दिसले आणि त्यानंतर अचानकच वेगळे झाले. कारण, यावेळी वॉर्नला त्याच्या पत्नीने इतर महिलेसोबत चॅटिंग करताना पकडलेलं, असे म्हणले जाते. यानंतर त्यांचे वैवाहिक नाते फार काळ टिकलंच नाही.
ब्रिटिश नर्समुळे वॉर्नला गमवावं लागलं होतं उपकर्णधारपद
आयपीएलच्या पहिल्याच हंगामात २००८ साली राजस्थान रॉयल्स संघाला आपल्या नेतृत्वाखाली पहिलं किताब मिळवून देणारा वॉर्न कधीच ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार बनू शकला नाही. माध्यमांतील वृत्तानुसार सन २००० साली वॉर्नला ऑस्ट्रेलियाचं उपकर्णधारपद गमवावं लागलं होतं. त्यादरम्यान त्याच्यावर एक ब्रिटिश नर्सशी वाईट गोष्टी बोलण्याचा आरोप लावण्यात आलेला. वॉर्न हे आरोप मान्य करत म्हणाला होता की, याची सुरुवात तिनेच केली होती.
सेक्स स्कँडलमध्ये अडकलेला वॉर्न
वॉर्न सेक्स स्कँडलमध्येही अडकलेला. २००६ साली वॉर्नचं नाव पुन्हा एकदा सेक्स स्कँडलमध्ये आलं होतं. यावेळी त्याचे मॉडेल्ससोबतचे न्यूड फोटोज व्हायरल झाले होते. इतकंच नाही, तर दोन्ही मॉडेल्ससोबत वॉर्नचा हा वादग्रस्त फोटो एका ब्रिटीश मॅगझिनने छापला होता. यानंतर एकच गोंधळ उडाला होता. इतकं होऊनही वॉर्न थांबला नव्हता. त्याचे अनेक महिलांशी नाव जोडले गेले होते.
वॉर्नवर हॉलिवूड स्टारशी साखरपुडा आणि मायकल क्लार्कच्या पत्नीशी अफेअरचा आरोपही लावण्यात आला होता. वॉर्नचं नाव तसं अनेक महिलांशी जोडलं गेलंय. सन २०१३ साली हॉलिवूड स्टार लिज हर्लेसोबत त्याच्या अफेअरची चर्चा होती. दोघांचा साखरपुडाही झालेला. मात्र, त्यांच्या लग्नाची नौका नदी पार करूच शकली नाही. कारण, त्यावेळी वॉर्नचं मन कुठल्यातरी पॉर्न स्टारवर जडलं होतं, अशी बातमी समोर आली होती. वॉर्नवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कच्या एक्स पत्नीशी जवळीक साधण्याचाही आरोप लावण्यात आला होता. क्लार्कने २०२० साली ऑस्ट्रेलियन मॉडेल, अभिनेत्री आणि टीव्ही प्रेझेंटर कायली बोल्डीशी घटस्फोट घेतला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा बिग बॉसमध्ये सायमंड्सने केलेलं प्रपोज, चपाती अन् करी बनवायलाही शिकला होता
खेळाडू मैदानावर बॉल पँटवर का घासतात? जाणून घ्या कारण