कोणत्याही क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंमध्ये छोटे-मोठे वाद होताना दिसणे, काही नवीन गोष्य नाही. बऱ्याचदा खेळाडू शाब्दिक बाचाबाची करताना दिसतात. कधी-कधी हा वाद वाढत जाऊन खेळाडूंचे एकमेकांच्या अंगावर जाणे, अशा गोष्टीही घडताना दिसतात. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी (Second Test) सामन्यात असाच काहीसा वाद पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाच्या दुसऱ्या डावादरम्यान जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि दक्षिण आफ्रिकेचा मार्को जेन्सन (Marco Jansen) यांच्यात विवाद (Controversy Between Bumrah And Jansen) झाल्याचे पाहायला मिळाले.
त्याचे झाले असे की, भारताच्या दुसऱ्या डावादरम्यान बुमराह दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला होता. यावेळी ५४ वे षटक टाकण्यासाठी डावखुरा वेगवान गोलंदाज जेन्सन आला होता. त्याने पुढे तळातील फलंदाज फलंदाजी करत असतानाही १२० किमी दर ताशीपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली. यावर बुमराहला फटके मारण्यास अडचण येत होती.
जेन्सनच्या षटकातील तिसरा चेंडू तर बुमराहच्या खांद्याला लागून गेला. यानंतर तो बुमराहकडे डोळे वटारून पाहू लागला. यावर बुमराहने शाब्दिक प्रतिक्रिया न देता आपल्या हाताने खांद्यावरची धूळ झटकत असल्याची कृती केली.
https://twitter.com/vlkjayanth_1718/status/1478691635344990210?s=20
यावरून चिडलेल्या जेन्सनने पुढे असा काही चेंडू फेकला, ज्यावर पुन्हा बुमराहला एकही धाव घेता आली नाही. हा चेंडू टाकल्यानंतर जेन्सन पुन्हा रागाने बुमराहकडे पाहत काहीतरी बोलू लागला. हे बघून बुमराहचाही पारा चढला आणि तो जेन्सनला इकडे ये असा इशारा करत त्याच्या दिशेने गेला. जेन्सननेही पुढे माघार घेतली नाही आणि दोघांमध्ये भर मैदानात वाग्युद्ध रंगले. मात्र त्वरित मैदानी पंचांनी दोघांना शांत केल्याने हा विवादच लवकरच मिटला.
https://twitter.com/DheerajpareekDP/status/1478696130888097794?s=20
परंतु त्यांच्यातील या विवादाने सामना दर्शकांचे मात्र लक्ष वेधले आहे. अनेकांनी त्यांचा मैदानांतील या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
https://twitter.com/vivekmanesar002/status/1478696183753105409?s=20
यान्सिनच्या हे डावातील ५४ वे षटक निर्धाव राहिले. बुमराह त्याच्या या षटकातील एका चेंडूवर धाव घेऊ शकला नाही. पुढे ५७ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर यान्सिनच्याच हाती झेल देत बुमराह बाद झाला. त्याने या डावात १४ चेडूंचा सामना करताना ७ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहचा टॉप १० मध्ये प्रवेश, तर कर्णधार कोहलीची मोठी घसरण
“ये तो होना ही था!” जोहान्सबर्ग कसोटीत ७ विकेट घेताच शार्दुल ठाकूरचे मीम व्हायरल
Video: जेव्हा बुमराहने अश्विनच्या गोलंदाजी ऍक्शनची केली नक्कल, फिरकीपटूही पाहून झाला लोटपोट
हेही पाहा-