---Advertisement---

“ये तो होना ही था!” जोहान्सबर्ग कसोटीत ७ विकेट घेताच शार्दुल ठाकूरचे मीम व्हायरल

Shardul-Thakur
---Advertisement---

जोहान्सबर्गच्या (Johannesburg) मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना (Sa vs Ind 2nd test)  सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (४ जानेवारी) भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकूरने (shardul thakur)  अप्रतिम कामगिरी केली होती. या कामगिरीनंतर त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या कामगिरीनंतर विराट कोहलीने दिलेली रिॲक्शन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

शार्दुल ठाकूरने दक्षिण आफ्रिका विरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. त्याने पहिल्या डावात ६१ धावा खर्च करत ७ गडी बाद केले. दरम्यान, जेव्हा त्याने किगन पीटरसनला ६२ धावांवर बाद केले, त्यावेळी दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला विराट कोहली (Virat Kohli reaction) देखील भलताच खुश झाला होता. तो डगआऊटमध्ये बसून टाळ्या वाजवतना दिसून आला होता.

तसेच शार्दुल ठाकूरच्या या कामगिरीनंतर नेटकऱ्यांनी त्याचे मिम व्हायरल करायला सुरुवात केली आहे. एका युजरने मिर्झापूर वेब सिरीजमधील एक डायलॉगचा मिम शेअर केला आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, “बेटा अगर हम खेल रहे हो तो, हे पहले ही डीसाईड हो चुका होता है की, हमारी जित होगी.” याचे कारण असे की, शार्दुल ठाकूरने आतापर्यंत जितके सामने खेळले आहेत, त्यामध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला नाहीये.

तसेच एका युजरने प्रसिद्ध वेब सिरीज ‘स्कॅम’ मधील एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये असे दाखवण्यात आले आहे की, जेव्हा जेव्हा भारतीय संघाला भागीदारी तोडायची असते त्यावेळी शार्दुल ठाकूरची गरज भासते. तसेच एका युजरने लिहिले की, “शार्दुल ठाकूरने गडी बाद केले, तर लॉर्ड शार्दुल ठाकूर ट्विटर वर ट्रेंड होणारच.”

 

 

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर केएल राहुलने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला २०२ धावा करण्यात यश आले होते. ज्यामध्ये केएल राहुलने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली होती.

तर या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाचा संपूर्ण डाव २२९ धावांवर संपुष्टात आला होता. दक्षिण आफ्रिका संघाकडून किगन पिटरसनने सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली. तर भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ७ गडी बाद केले.

महत्वाच्या बातम्या :

पहिल्या वनडेला एक्कावन्न वर्षे पूर्ण! वाचा ‘त्या’ ऐतिहासिक सामन्याबाबत काही रंजक गोष्टी

जेव्हा रवी शास्त्रींनी सिडनीत ९ तास फलंदाजी करत साकारली होती द्विशतकी खेळी, पाहा व्हिडिओ

हे  नक्की पाहा:

संघाला कठीण परिस्थितीतून सावरणारे ५ गोलंदाज | 5 Memorable Last Overs

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---