सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या या भयानक साथीच्या रोगाने त्रस्त आहे. जगभरातील अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. या व्हायरसमुळे अनेक देशांनी लॉकडाऊन केले आहे. प्रत्येकजण आपल्या देशाला या व्हायरसमधून मुक्त करण्यासाठी मदत करत आहेत. यादरम्यान प्रत्येकजण आपल्या घरात बंद आहे.
या व्हायरसमुळे भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांच्या जीवनातदेखील बदल झाला आहे. त्यांचा हा बदल पाहून प्रत्येकाला युवा गावसकरांची आठवण येत आहे.
खरं तर लॉकडाऊनमध्ये गावसकरांनी आपले वजन (Weight) कमी केले आहे. तसेच आश्चर्याची बाब म्हणजे त्यांचे वजन ५० वर्षांपूर्वीच्या युवा गावसकरांइंतके झाले आहे. याची माहिती स्वत: गावसकरांनी दिली आहे.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत गावसकरांनी (Sunil Gavaskar) सांगितले की, ‘खरंतर मी हे थोडे सहजतेने घेत आहे. उशीरा उठत आहे. संध्याकाळी माझ्या टेरेसवर फिरतो. मी तूम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटेल की मी माझे वजन माझ्या पदार्पणावेळी होते तेवढे कमी झाले आहे. मी जेव्हा पदार्पण केले होते त्यापेक्षा आत्ता केवळ ०.०३ किलोग्रॅम जास्त आहे.’
गावसकर पुढे म्हणाले की, “हा सर्व लॉकडाऊनचा परिणाम आहे. आहारातील काही गोष्टींवर प्रतिबंध आहे. यादरम्यान टी.व्ही. मालिकादेखील पाहतो. तसेच संपूर्ण परिवार यावेळी एकत्र नसल्यामुळे व्हिडिओ कॉलिंगमार्फत सर्व एकत्र येऊन चर्चा करतो.
गावसकरांनी भारतीय संघात पदार्पण करून आता जवळपास ५० वर्षे झाली आहेत. त्यांनी १९७१मध्ये पदार्पण केले होते.
अन्य वाचनीय लेख-
– तेव्हा सचिनच्या आईने पाहिला होता सचिन खेळलेला पहिला आंतरराष्ट्रीय सामना
– सचिन नाही तर हे आहेत लाॅर्ड्सवर शतक करणारे ५ मराठमोळे मुंबईकर क्रिकेटपटू
–सचिनच्या नावावर जरी धावा असल्या तरी हटके विक्रम आहेत कूकच्याच नावावर