पुणे । सत्यम व्हेकेशन्स यांच्या तर्फे आयोजित ४थ्या सत्यम व्हेकेशन्स कॉर्पोरेट टी-२०क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत सनगार्ड एएस/एफआयएस ग्लोबल, इन्फोसिस या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पूना क्लब क्रिकेट मैदान आणि लिजेंड्स क्रिकेट मैदान येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात नितेश सप्रे याच्या ४०धावांच्या खेळीच्या जोरावर सनगार्ड एएस/एफआयएस ग्लोबल संघाने मास्टरकार्ड संघाचा ५४ धावांनी पराभव केला.
पहिल्यांदा खेळताना सनगार्ड एएस/एफआयएस ग्लोबल संघाने २०षटकात ९बाद १४८धावा केल्या. यात नितेश सप्रे ४०, पवन आनंद २५, गीत देसाई २१यांनी धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मास्टरकार्ड संघाचा डाव १८.४ षटकात ९४धावावर आटोपला. यामध्ये आशिष भोसले २१, ईशान शिंदे २८यांनी थोडासा प्रतिकार केला.
सनगार्ड एएस/एफआयएस ग्लोबलकडून अनिल घुगे(३-४), सुरज दुबल(३-६)यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी नितेश सप्रे ठरला.
दुसऱ्या सामन्यात भास्कर श्रीवास्तव(३-३)याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इन्फोसिस संघाने इक्लर्क्स संघाचा ७ गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली. स्पर्धेचे उदघाटन सत्यम व्हेकेशन्सचे बिझनेस हेड प्रशांत त्रिवेदी यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी:
सनगार्ड एएस/एफआयएस ग्लोबल: २०षटकात ९बाद १४८धावा(नितेश सप्रे ४०(२६), पवन आनंद २५(२२), गीत देसाई २१(२९), अमित भगत ३-१४)वि.वि.मास्टरकार्ड: १८.४ षटकात सर्वबाद ९४धावा(आशिष भोसले २१(१२), ईशान शिंदे २८(२६), अनिल घुगे ३-४, सुरज दुबल ३-६);सामनावीर-नितेश सप्रे; सनगार्ड एएस/एफआयएस ग्लोबल ५४धावांनी विजयी;
इक्लर्क्स: १४षटकात सर्वबाद ४१धावा(अश्विन हातेकर २३(१४), भास्कर श्रीवास्तव ३-३, शेरॉन शोमसन २-६, आनंद कोंडा २-१५)पराभूत वि.इन्फोसिस: ५.५ षटकात ३बाद ४४धावा(करण पांड्या २२, हरेंद्र कौशिक २-१५);सामनावीर-भास्कर श्रीवास्तव; इन्फोसिस ७ गडी राखून विजयी.