---Advertisement---

बाबो! आयपीएलमधील एका बॉलची किंमत आहे तब्बल २१ लाख

On: सोमवार, मे 30, 2022 2:00 PM
IPL-Ball-Cost
---Advertisement---

शाहरुखच्या ओम शांती ओम सिनेमात दीपिका पदुकोणच्या तोंडी एक डायलॉग आहे, ‘एक सिन्दूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू’; हाच डायलॉग आयपीएलमध्ये म्हटला गेला तर, असा म्हटला जाईल ‘एक बॉल की कीमत तुम क्या जानो फॅन बाबू’. हा झाला मजेचा भाग. मात्र, खरंच तुम्हाला आयपीएलमध्ये टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक बॉलची किंमत माहित आहे का? किंवा एक बॉलमूळे काय-काय घडलेय, हे माहित आहे का?

सुरुवातीलाच आपण जाणून घेऊ की, आयपीएलमध्ये टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक बॉलची किंमत किती असते? हे माहीत करून घेण्यासाठी आपल्याला सारी गोळाबेरीज करावी लागेल. आयपीएल जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आहे यात काही वादच नाही. म्हणजे आपल्याकडे एका प्लेयरला १७ कोटी एका सिझनचे मिळतात तेवढ्यात काही ठिकाणी लीग होते. म्हणून तर काही इंटरनॅशनल क्रिकेटर्स आपल्या देशासाठी खेळायचे सोडून आयपीएलमध्ये खेळायला प्राधान्य देतात. कारण एकच पैसा.

आयपीएलमध्ये पैसा किती आहे यावरून आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे म्हणजे एका बॉलची किंमत‌ किती? याकडे जाऊया. तर, आपण फक्त आयपीएलला सर्वात जास्त इन्कम येतो त्या ब्रॉडकास्टिंग राइट्सबाबत जाणून घेऊ. २०१७ मध्ये शेवटच्या वेळी ब्रॉडकास्टिंग राईट्सचा लिलाव झालेला. स्टार स्पोर्ट्सने हे राईट्स घेण्यासाठी किंमत मोजली होती १६ हजार तीनशे अठ्ठेचाळीस कोटी. आता या १६ हजार तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची विभागणी करत, २०२२ आयपीएलच्या ७४ मॅचचे २४० बॉल पकडून प्रत्येक बॉलची किंमत काढली तेव्हा ती आली २१ लाख. एक बॉल टाकण्यासाठी रन-अप पकडून जास्तीत जास्त पाच सेकंद लागत असतील. म्हणजे आपल्या आयपीएलमध्ये पाच सेकंदात २१ लाख रुपयांचा चुराडा होत असतो.

हे झालं पैशाचं. एका बॉलमूळे आपल्याला आयपीएलमध्ये काय काय जगावेगळं पाहायला मिळालं; त्याच्यावर ही एक नजर टाकू. क्रिकेटच्या खेळात एक एक बॉल महत्त्वाचा असतो. अंपायरचा निर्णय चुकला की, लीगल बॉल नो‌ किंवा वाईड होतो आणि त्यानंतर होतात न पाहिलेल्या घटना. २०१९ आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध ‌चेन्नई सुपरकिंग्ज मॅचवेळी एक संशयास्पद बॉल अंपायरने नो बॉल दिला नाही आणि मग सरळ डग आउटमध्ये बसलेला कॅप्टन कुल धोनी साऱ्या नियमांना आणि स्पोर्ट्समनशिप स्पिरिटशिपला तारतार करत अंपायरशी हुज्जत घालायला सरळ राऊंडमध्ये आला. याच नोबॉल पायी धोनीचा शिष्य म्हणवून घेणाऱ्या रिषभ पंतने, आपल्या बॅटर्सला “आता खेळू नका सरळ बाहेर या” म्हणत इशारा केला होता. नो बॉलचा विषय निघालाच आहे तर, तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की, आता कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसणाऱ्या पियुष चावलाने आयपीएलमध्ये ३८६ ओव्हरपर्यंत एकही नो बॉल टाकला नव्हता. तसेच बुमराह आयपीएलच्या इतिहासात सगळ्यात जास्त नोबॉल टाकून बसलाय.

यावर्षी खरंतर आयपीएलवाल्यांनी बॉल आणि बॉलर्सला सन्मान दिला. प्रत्येक मॅचमध्ये सर्वात फास्ट बॉल टाकणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस दिले जातेय. आख्या सीझनच्या १४ मॅच खेळताना उमरान मलिकने प्रत्येक मॅचमध्ये फास्टेस्ट बॉल टाकत १४ लाख कमावलेत. पण आयपीएलच्या इतिहासातील सर्वात फास्ट बॉल कोणी टाकला आहे तुम्हाला माहित आहे का? याच उत्तर आहे शॉन टेट‌. लाईन, लेंथ, टप्पा या गोष्टींचा कधीही विचार न करता फक्त फास्ट बॉलिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियन टेटने ताशी १५७.७ किमीच्या स्पीडने बॉल टाकलाय.

आयपीएलमध्ये एका बॉलचे महत्व इतक‌ की, आयपीएलच्या १४ सीजनपैकी तीन सिझनचा चॅम्पियन लास्ट बॉलवर ठरलाय. तर अशी ही आयपीएलच्या एका बॉलची छोटीसी कहानी.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

आयपीएल २०२२मधील एका बॉलची किंमत पडली २१ लाख रुपये | IPL | Cost of a Single Ball | Cricket Ball

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल कॉमेंटेटरना पगार मिळतो तरी किती? घ्या जाणून

पैसाच पैसा! आयपीएलच्या टीम मालकांची एकूण संपत्ती माहितीय का? पाहा अंबानी ते काव्या मारनपर्यंतची यादी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---