भारतात सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण या तीन गोष्टींना प्रचंड वलय आहे. त्यातला त्यात क्रिकेटला तर धर्माचंच स्वरूप मानलं जातं, आणि क्रिकेटपटूंना देव. त्यामुळे पैसे, प्रसिद्धी या सर्व गोष्टी खेळाडूंच्या पायावर लोटांगण घालीत असतात. परंतु भारतीय क्रिकेटमध्ये असा एक खेळाडू होऊन गेला आहे, त्याने आपल्या वयाच्या 40व्या वर्षी कसोटी पदार्पण केले, आणि नंतर एक दिवस तो अचानक गायब झाला. त्या खेळाडूचे नाव कार्टर रामास्वामी. माजी भारतीय क्रिकेटर कार्टर रामास्वामी गायब झाल्यानंतर त्यांच्या जिवंत असण्याचे किंवा मृत पावल्याचे कोणतेच पुरावे मिळाले नाहीत, त्यामुळे त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे.
16 जून 1896 रोजी मद्रास राज्यात त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी क्रिकेट व्यतिरिक्त टेनिसमध्ये देखील देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. 15 ऑक्टोबर 1985 साली घराबाहेर गेले, परंतु परतून आलेच नाही.
कार्टर रामास्वामी यांनी क्रिकेट पदार्पण करण्याआधी त्यांनी टेनिसमध्ये देखील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 1922 साली ते डेविस चषक खेळण्यास उतरले होते. पहिल्या फेरीत त्यांच्या संघाने रोमनियाला हरवले, परंतु दुसऱ्या फेरीत त्यांच्या संघाला स्पेनकडून पराभव स्वीकारावा लागला. रामास्वामी यांनी आपल्या दोन्ही दुहेरी सामन्यांत विजय मिळवला होता. ते 1919 ते 1923 पर्यंत केम्ब्रिज विद्यापीठात शिकत असताना स्थानिक स्पर्धा जिंकण्यात यशस्वी ठरले हेत.
ग्रँड स्लॅम स्पर्धेत देखील उतरले
कार्टर रामास्वामी 1922 साली विंम्बल्डन खेळण्यास उतरले होते, त्यांनी पहिल्या फेरीचा सामना जिंकला, परंतु दुसऱ्या फेरीत त्यांचा पराभव झाला. 1923 साली त्यांनी साऊथ ऑफ इंग्लंड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात गॉर्डन लोवला तीन सेटमध्ये हरवून किताब आपल्या नावावर केला होता. कार्टर रामस्वामी हे तिसरे भारतीय क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळात देशाचं प्रतिनिधित्व केले आहे. इतर दोन क्रिकेटपटूंची नावे एमजे गोपालन आणि यजुवेंद्र चहल आहे. रामास्वामी यांचे वडील, दोन भाऊ, मुलगा आणि भाचे देखील क्रिकेट खेळलेले आहेत.
वयाच्या 40व्या वर्षी मिळाली खेळायची संधी
कार्टर रामस्वामी यांना 40व्या वर्षी जुलै 1936 साली कसोटी क्रिकेट खेळायची संधी मिळाली. इंग्लंडमध्ये मँचेस्टर येथे झालेल्या सामन्यात त्यांनी दोन डावात 40 आणि 60 धावा केल्या. तो सामना अनिर्णित राहिला होता. त्यांनी आपला अंतिम कसोटी सामना ऑगस्ट 1936 इंग्लडविरुद्धच ओव्हलच्या मैदानावर खेळला होता. ज्यामध्ये त्यांनी अनुक्रमे 29 आणि 41 धावा केल्या होत्या. पंरतु या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. (Cotah Ramaswamy played both cricket and tennis for India.)
त्यांनी 53 प्रथम श्रेणी सामन्यांत 29 च्या सरासरीने 2400 धावा केल्या, ज्यामध्ये 2 शतकं आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्यांनी 30 बळी देखील टिपले आहेत. 29 धावा देऊन 4 बळी ही त्यांची सर्वोत्तम गोलंदाजी होय. 15 ऑक्टोबर 1985 ला घराबाहेर पडले ते परत न येण्यासाठीच. त्यानंतर त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही, त्यामुळे त्यांना मृत मानण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील ‘अखेरचा’ शिलेदार
आठवणीतील सामना: २२ वर्षांपूर्वी झाला होता क्रिकेट विश्वचषकातील सर्वात रोमांचकारी सामना, पाहा व्हिडिओ
झुलनच्या दैदिप्यमान कारकीर्दीत लिहले गेले आणखी एक सुवर्णपान; पाचव्या षटकात केली विक्रमी कामगिरी