एकीकडे भारतात इंडियन प्रीमियर लीगचा १५ हंगाम सुरू असताना दुसरीकडे इंग्लंडमध्ये काऊंटी चॅम्पियनशीपचे सामने सुरू आहेत. या स्पर्धेत १२ ते १५ मे दरम्यान लँकाशायर विरुद्ध यॉर्कशायर संघात सामना झाला. हा सामना अनिर्णित राहिला. पण, असे असले तरी, ३९ वर्षीय जेम्स अँडरसन याने त्याच्या गोलंदाजीने सर्वांचीच मने जिंकली.
अँडरसनसमोर रुट अनुत्तरीत
काऊंटीमध्ये (County Championship) जो रुट (Joe Root) यॉर्कशायर संघाकडून आणि जेम्स अँडरसन (James Anderson) लँकाशायर संघाकडून खेळतात. त्यामुळे इंग्लंडचे हे दोन्ही अनुभवी खेळाडू या सामन्यात आमने-सामने होते. या सामन्यात यॉर्कशायर संघाला लँकाशायरकडून फॉलोऑन मिळाला होता. त्यामुळे फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात यॉर्कशायर संघ जेव्हा मैदानात उतरला, तेव्हा अँडरसनने कमालीची गोलंदाजी केली.
अँडरसनने दुसऱ्या डावात यॉर्कशायरकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रुटला २२ व्या षटकात केवळ ४ धावांवर माघारी धाडले. अँडरसनने रुटला या षटकातील टाकलेला चौथा चेंडू इतका अप्रतिम वेगात स्विंग झाला, की ऑफसाईडचा आणि मधल्या स्टंप उडून खाली पडला. त्याचा हा चेंडू पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले. रुटही हा चेंडू पाहून स्तब्ध झाला होता. अँडरसनच्या या विकेटचे त्याचा साथीदार स्टुअर्ट ब्रॉडनेही कौतुक केले (James Anderson Clean Bowled Joe Root).
विशेष म्हणजे जो रुट आणि अँडरसन बराच काळ इंग्लंड संघात एकत्र खेळले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी इंग्लंडने केलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान अँडरसन आणि ब्रॉड या जोडगोळीला इंग्लंड संघातून वगळण्यात आले होते. त्यामुळे बरीच टीका झाली होती. पण, आता अँडरसनने आपला फॉर्म दाखवत पुन्हा राष्ट्रीय संघाचे दार ठोठावले आहे.
Oh my reverse swing 😍😍
— Stuart Broad (@StuartBroad8) May 15, 2022
दरम्यान, लँकाशायर आणि यॉर्कशायर यांच्यातील सामन्यादरम्यान लँकाशायरने पहिल्या डाव ९ बाद ५६६ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर यॉर्कशायरने रुटच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात सर्वबाद ३७९ धावा केल्या. पण, तरीही त्यांना फॉलोऑनचा सामना करावा लागला. यानंतर यॉर्कशायर दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना अखेरच्या दिवसाचा खेळ संपल्याने सामना अनिर्णित राहिला.
इंग्लंड संघ जातोय मोठ्या बदलांमधून
काहीदिवसांपूर्वीच जो रुट याने इंग्लंडचे कसोटी कर्णधारपद सोडले होते. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडची मागील काही महिन्यांमधील कामगिरी फारशी बरी झाली नव्हती. त्याचमुळे त्याने हे कर्णधारपद सोडल्याची चर्चा आहे. दरम्यान, ऍशेस मालिकेतही इंग्लंडला पराभवाचा धक्का बसला होता, ज्यानंतर रुटच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
आता रुटच्या ऐवजी अष्टपैलू बेन स्टोक्सकडे इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. तसेच न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्यूलम याला इंग्लंडच्या कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. इंग्लंडला आता पुढची मालिका न्यूझीलंडविरुद्ध खेळायची आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई इंडियन्समध्ये सूर्यकुमारची जागा मिळालेला आकाश मधवाल आहे कोण? जाणून घ्या कामगिरी
मराठी माणसाला अभिमान वाटेल असा आहे वानखेडे स्टेडियम बनण्याचा इतिहास
‘कठीण परिस्थितीत प्रदर्शन करायला…’, पंजाबविरुद्धचा ‘मॅन ऑफ द मॅच’ शार्दुल ठाकूरची खास प्रतिक्रिया