आशियातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेला आशिया चषक २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) खेळला जाणार आहे. मुख्य फेरीपूर्वी ओमान येथे २० ऑगस्टपासून पात्रता फेरीचे सामने खेळवले जातील. यामध्ये हाँगकाँग, कुवेत, यूएई आणि सिंगापूर हे चार संघ सहभागी होणार आहेत.
पात्रता फेरीतील विजयी संघ थेट मुख्य फेरीत प्रवेश करेल. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका आधीच मुख्य फेरीत दाखल झाले आहेत. आता यूएईनेही पात्रता फेरीसाठी आपला संघ जाहीर केला होता. मात्र, पात्रता फेरीच्या एक दिवस आधी यूएई टी२० संघाचा कर्णधार बदलण्यात आला आहे. यापूर्वी अहमद रझा ही जबाबदारी सांभाळत होता. परंतु, सीपी रिझवान आशिया चषक पात्रता फेरीत यूएईचा कर्णधार असेल.
युएईच्या वनडे संघाचा कर्णधार असलेला रिझवान आता टी२० संघाचे देखील नेतृत्व करेल. रिझवान आतापर्यंत केवळ ७ टी२० सामने खेळला आहे. त्याचा जन्म भारतातील केरळ राज्यात झाला असून तो इलेक्ट्रिक इंजिनियर म्हणून काम करतो. रिझवान याची कर्णधारपदी नेमणूक करण्यात आली असली तरी, रझा याला हटवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अहमद रझा याच्या नेतृत्वाखाली युएई संघाने टी२० मध्ये चमकदार कामगिरी केली. रझा याच्या नेतृत्वाखाली युएईने २७ पैकी १८ टी२० सामने जिंकले होते. रझा याची गणना यूएईच्या यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. त्याच्या नेतृत्वाखाली यूएईने यावर्षी फेब्रुवारीमध्ये क्वालिफायर-ए जिंकून यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवली होती. यूएईने अंतिम फेरीत आयर्लंडचा पराभव केलेला. यूएईने आयर्लंडला हरवलेला हा सलग पाचवा टी२० सामना होता.
आशिया चषक पात्रता फेरीसाठी युएई संघ-
सीटी रिझवान (कर्णधार), चिराग सुरी, मुहम्मद वसीम, वृत्य अरविंद, अहमद रझा, बासिल हमीद, रोहन मुस्तफा, काशिफ दौड, कार्तिक मयप्पन, झाऊर खान, झावर फरीद, अलिशान शराफू, साबीर अली, आर्यन लाक्रा, सुलतान अहमद, जुनैद सिद्दीकी, आणि फहाद नवाज.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या वर्ल्डकप विजयाचा नायक करतोय पुनरागमन! स्वत:च चाहत्यांना दिली खूशखबर
भारताच्या दौऱ्यामुळे झिम्बाब्वे बोर्डाची चांदी, ३ वनडे सामन्यांतून कमावणार ‘इतके’ कोटी
झिम्बाब्वेच्या गोपिकांना भारताच्या कन्हैयाची भुरळ! चाहरचा महिला चाहतींसोबतचा व्हिडिओ व्हायरल