मुंबई । कॅरिबियन प्रीमियर लीगमधील सामन्यात गयाना अमेझॉन वॉरियर्सने बार्बाडोस ट्रायटेंडसचा 6 गडी राखून पराभूत केले. यासह, गत चॅम्पियन्स बार्बाडोस ट्रायटेडस या सीपीएल हंगामातून बाहेर पडली आहे. सीपीएलच्या इतिहासात प्रथमच असे घडले की, गतविजेता संघ बाद फेरीत पोहोचला नाही. गुरवारी झालेल्या या सामन्यात बार्बाडोस अवघ्या 89 धावांवर बाद झाला, त्यामुळे त्यांना सामना गमावावा लागला. या सामन्यादरम्यान, गयानाचा गोलंदाज रोमारियो शेफर्डने असे काही केले ज्याची सोशल मीडियावर जोरदार प्रशंसा होत आहे.
या सामन्यात रोमारियोने सलग दोन चेंडूंतून दोन फलंदाजांना बाद केले. त्यांनंतर त्याने हा आनंद वेगळ्या प्रकारे साजरा केला. विकटे घेतल्यानंतर, तो एकामागून एक तीन वेळा कोलंटउडी घेत आणि हवेत उभा राहिला. हा स्टंट पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. सोशल मीडियावरही या स्टंटबद्दल त्याचे कौतुक होत आहे. खुद्द आयसीसीने या गोलंदाजाचे कौतुक केले असून हा व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. आयसीसीने लिहिले की, ‘क्रिकेटच्या मैदानावर अशा प्रकारच्या वळण आणि बाउन्सची अपेक्षा आपण करू शकत नाही.’
Not the kind of turn and bounce you expect on a cricket field 🤸 pic.twitter.com/MPRgDnW8Tt
— ICC (@ICC) September 4, 2020
या सामन्यात बार्बाडोसचे फलंदाज मोठ्या धावा करू शकले नाहीत. प्रथम फलंदाजीसाठी करताना त्यांचा संघ 9 बाद 89 धावा करू शकला. मधल्या फळीतील फलंदाज मिशेल सॅन्टनर 18 आणि नईम यंग 18 धावांचे योगदान दिले. वॉरियर्सकडून इम्रान ताहिर (12 धावांत 3) आणि रोमारिओ शेफर्ड (22 धावांत 3 विकेट) हे यशस्वी गोलंदाज ठरले. त्यानंतर वॉरियर्सने शिमरोन हेटमेयर (नाबाद 32), चंद्रपाल हेमराज (29) आणि रॉस टेलर (नाबाद 16) यांच्या धावांच्या जोरावर 14.2 षटकांत चार गडी गमावून 90 धावांचे लक्ष्य पार केले.
महत्त्वाच्या बातम्या –
सीएसके संघाचा नवा उपकर्णधार कोण असेल? चाहत्याने केली विचारणा; फ्रेंचायझीचे आश्चर्यकारक उत्तर
डेव्हिड वॉर्नरच्या स्फोटक खेळीनंतरही ऑस्ट्रेलिया पराभूत; इंग्लंडची मालिकेत आघाडी
दोन आयपीएल संघ करणार होते त्याला आपल्या ताफ्यात सामील, परंतू बोर्डाने घातला खोडा
ट्रेंडिंग लेख –
बडेमियाँ-छोटेमियाँ! आयपीएलमध्ये खेळलेल्या ३ भारतीय भावांच्या जोड्या
आयपीएल २०२० मध्ये खेळणाऱ्या सर्व संघातील सर्वात महागडे खेळाडू, पहा किंमत
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले ३ खेळाडू; एकाही भारतीयाचा मात्र समावेश नाही