इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) तयारीचा सर्वात पहिला टप्पा असतो, खेळाडूंचा लिलाव. या लिलावात दरवर्षी आयपीएल फ्रंचायझी संघातील काही खेळाडूंना बाहेर करतात किंवा नव्या खेळाडूंना संघात दाखल करतात. आपल्या संघाला मजबूत बनवण्यासाठी फ्रंचायझी वाट्टेल तेवढा पैसा खर्च करतात. नेहमीप्रमाणे यंदाही आयपीएलचा लिलाव पार पडला. या लिलावात सर्व फ्रंयाचझींनी मोठमोठ्या बोली लावत काही खेळाडूंना आपल्या संघात सामील केले. तर, काही खेळाडू अगदी तुटपूंज्या किंमतीत संघात दाखल झाले.
या लेखात, आयपीएल २०२०च्या लिलावात सर्व ८ संघांच्या सर्वात महागड्या खेळाडूंची माहिती देण्यात आली आहे. तर, जाणून घ्या त्या सर्व खेळाडूंची नावे त्यांच्या किंमती.. Most Expensive Player Of Each Team Of IPL
चेन्नई सुपर किंग्स – एमएस धोनी (१५ कोटी)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला असला तरी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. तो आयपीएलच्या दूसऱ्या सर्वात यशस्वी संघ, चेन्नई सुपर किंग्स (सीएसके)चा कर्णधार आहे.
आजवर आपल्या नेतृत्त्वाखाली धोनीने सीएसकेला ३वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. सीएसकेच्या आयपीएल इतिहासात त्याने नेतृत्त्वासह फलंदाजी आणि यष्टीरक्षण विभागातही दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे धोनीला सीएसकेचा अविभाज्य भाग मानले जाते. तो जरी आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून सीएसकेचा भाग असला, तरी संघ त्याला कोणत्याही किंमतीत बाहेर करणार नाही. यंदा सीएसकेने त्याला १५ कोटी रुपये देत आहे.
दिल्ली कॅपिटल्स – रिषभ पंत (१५ कोटी)
आयपीएलमध्ये एकापेक्षा एक दमदार युवा प्रतिभाशाली खेळाडू आहेत. या सर्व युवा खेळाडूंपैकी दिल्ली कॅपिटल्सचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने कमी काळात आयपीएलमध्ये आपली नवी ओळख निर्माण केली आहे. तो २०१६ साली आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून दिल्ली कॅपिटल्स संघाचाच भाग आहे. तेव्हापासून त्याने दिल्लीकडून ५४ सामने खेळत १७३६ धावा केल्या आहेत.
२०१८ मध्ये दिल्लीने रिषभला १५ कोटींमध्ये संघात कायम केले होते. त्यामुळे त्याला यंदाच्या लिलावातही १५ कोटी रुपये मिळतील.
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (१५ कोटी)
रोहित शर्माने आपल्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्स संघाला आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ बनवले आहे. २०१३पासून मुंबई इंडियन्सचे नेतृत्त्व करत त्याने संघाला तब्बल ४ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. सोबतच त्याचा फलंदाजीतही महत्त्वाचा वाटा राहिला आहे. आपल्या १८८ सामन्यातील ४८९८ धावांसह रोहित आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.
त्यामुळे आपल्या हाती लागलेल्या या शानदार खेळाडूला मुंबई इंडियन्स कोणत्याही परिस्थितीत सोडण्यास तयार नाही. यंदा त्याला १५ कोटी रुपये मिळणार आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स – पॅट कमिन्स (१५.५० कोटी)
ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला गतवर्षीच्या त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शानदार प्रदर्शनामुळे प्रत्येक संघाला विकत घ्यायचे होते. याचा त्याला खूप फायदा झाला. तो यंदाच्या आयपीएल लिलावात सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर)ने त्याला तब्बल १५.५० कोटी रुपयांना संघात विकत घेतले आहे.
कमिन्स यापुर्वी २०१४-१५मध्ये केकेआरचा भाग होता. दरम्यान त्याला जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने केवळ ४ सामने खेळत २ विकेट्स घेतल्या होत्या. परंतु, गेल्या काही वर्षात त्याच्या प्रदर्शनात खूप बदल झाले आहेत. त्यामुळे तो यंदा केकेआरकडून दमदार प्रदर्शन करण्याच्या अपेक्षा असतील.
किंग्स इलेव्हन पंजाब – केएल राहुल (११ कोटी)
आजवर एकदाही आयपीएल न जिंकलेला किंग्स इलेव्हन पंजाब संघ यंदा ट्रॉफी पटकावण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या संघाला यंदा खूप मजबूत बनवले आहे. संघात अनेक दमदार भारतीय आणि परदेशी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये संघाचा कर्णधार केएल राहुल याला संघातील सर्वात महत्त्वपूर्ण खेळाडू समजले जात आहे.
त्याचे गेल्या वर्षातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रदर्शन उल्लेखनीय राहिले आहे. त्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाब संघाने त्याला यंदा ११ कोटी रुपयांना कायम केले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – विराट कोहली (१७ कोटी)
भारतीय संघाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली याचे गेल्या काही वर्षातील प्रदर्शन शानदार राहिले आहे. त्यामुळे आयपीएलचा प्रत्येक संघ या दमदार खेळाडूला आपल्या संघात सामाविष्ट करण्यासाठी तयार असतो. परंतु, आयपीएलच्या पहिल्याच हंगामात त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आपल्या संघात विकत घेतले आणि तेव्हापासून तो त्याच संघाचा भाग आहे.
जरी विराटने अजूनपर्यत आपल्या संघाला एकदाही आयपीएल विजेता बनवले नसले. तरी प्रत्येक हंगामातील त्याचे दमदार प्रदर्शन पाहून फ्रंचायझी त्याला सोडण्यास तयार नाहीत. याच कारणामुळे त्याला आयपीएल २०२०च्या लिलावात बेंगलोर संघाने विराटला १७ कोटी रुपयांना कायम केले आहे.
सनराइजर्स हैद्राबाद – डेविड वॉर्नर (१२.५० कोटी)
आयपीएलमध्ये अनेक परदेशी खेळाडू दरवर्षी आपला सहभाग नोंदवतात. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा धुरंदर फलंदाज डेविड वॉर्नर याचाही समावेश आहे. आयपीएलच्या सनराइजर्स हैद्राबाद संघासाठीचे त्याचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. २०१६ साली वॉर्नरने आपल्या नेतृत्त्वाखाली सनराइजर्स हैद्राबादला पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली होती.
याव्यतिरिक्त आयपीएलच्या इतिहासात एकदाही शून्यावर बाद न होता तब्बल ३ वेळा ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) जिंकण्याचा शानदार विक्रम त्याच्या नावावर आहे. वॉर्नरच्या या दमदार कामगिरीमुळे संघाला त्याला सोडायचे नाही. म्हणून त्यांनी गतवर्षी पार पडलेल्या आयपीएल लिलावात त्याला १२.५० कोटीच्या किंमतीला आपल्या संघात कायम केले.
राजस्थान रॉयल्स – स्टिव्ह स्मिथ आणि बेन स्टोक्स (१२.५०)
आयपीएलच्या पहिल्याच हंगामात आपल्या विजयाची पताका लावणारा संघ म्हणजे राजस्थान रॉयल्स. पण आयपीएलची सुरुवात आपल्या दमदार विजयासह करणाऱ्या राजस्थान संघाला नंतर आयपीएलच्या अंतिम सामन्यामध्येही पोहोचता आले नाही. परंतु, यंदा इतर संघांप्रमाणे राजस्थान रॉयल्सदेखील आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात असेल.
राजस्थानने आयपीएल लिलावात संघातील काही दमदार खेळाडूंवर खूप पैसा खर्च केला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सवर प्रत्येकी १२.५० कोटी रुपये खर्च केले आहेत.
ट्रेंडिंग लेख –
भारताचे २ दिग्गज फलंदाज, ज्यांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ठोकले वेगवान शतक
वनडे क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा पार करू शकतात सध्याचे ३ भारतीय फलंदाज
आयपीएल २०२० – हे ३ गोलंदाज ठरणार घातक, घेणार हॅट्रिक?
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानची पायाभरणी करणाऱ्या ‘या’ व्यक्तीचा पणतू आहे आयपीएल संघाचा मालक
धोनीच्या निवडीबाबत माजी प्रशिक्षकाचे मोठे विधान; म्हणतात, गांगुलीची इच्छा…
इंग्लंडमधील हा क्रिकेटपटू जातीवादामुळे झाला होता आत्महत्या करण्यास प्रवृत्त