fbpx
Wednesday, January 27, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएल २०२० – हे ३ गोलंदाज ठरणार घातक, घेणार हॅट्रिक?

September 4, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ IPL

Photo Courtesy: Twitter/ IPL


आयपीएलच्या १३ व्या सत्राच्या सुरूवातीला अजून काही दिवस शिल्लक आहेत. सर्व संघ आयपीएलच्या तयारीत व्यस्त आहेत. भारतातील कोरोना विषाणूच्या वाढीमुळे यावेळी युएईमध्ये आयपीएल होत आहे. आयपीएलचे सर्व सामने अबुधाबी, शारजाह आणि दुबई या मैदानांवर खेळले जातील. सलामीचा सामना १९ सप्टेंबरला आहे. यावेळी युएईमध्ये आयपीएल असल्याने खेळपट्यांचा जास्त फायदा फिरकीपटूंना मिळू शकेल. युएई खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरतात आणि अशा परिस्थितीत फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

रशीद खान, मिशेल सॅटनर, सुनील नरेन, अमित मिश्रा, आर अश्विन, मुजीब उर रहमान, रवींद्र जडेजा आणि इम्रान ताहिर हे गोलंदाज या हंगामात फलंदाजांसाठी घातक ठरतील. यंदाच्या हंगामात यातील बरेच गोलंदाज हॅटट्रिक घेऊ शकतात. जरी आतापर्यंत अनेक गोलंदाजांनी आयपीएलमध्ये हॅटट्रिक विकेट घेतल्या आहेत, परंतु या हंगामात आपल्याला काही हॅट्रिकही पाहायला मिळू शकेल.

या आयपीएल हंगामात कोणत्या ३ गोलंदाजांमध्ये हॅट्रिक घेण्याची क्षमता आहे हे या लेखातून पाहूया.

३. रशिद खान – सनरायझर्स हैदराबाद

सनरायझर्स हैदराबादचा दिग्गज फिरकी गोलंदाज राशिद खान देखील या हंगामात हॅट्रिक घेऊ शकतो. याचे सर्वात मोठे कारण असे की, तो सध्या आयपीएलपूर्वी सीपीएलमध्ये खेळत आहे. यामुळे त्याच्या गोलंदाजीतील लय टिकून राहू शकते. या व्यतिरिक्त त्याने युएईमध्ये अफगाणिस्तान संघासाठी बरेच सामने खेळले आहेत. या कारणास्तव, त्याला येथे गोलंदाजी कशी करायची हे चांगले माहित आहे.

राशिद खान हा घातक फिरकीपटू आहे आणि त्याच्याकडे विविध प्रकारे चेंडू वाळवण्याशी क्षमता आहे. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत ४६ सामन्यांत ५५ बळी घेतले आहेत. तसेच त्याच्या नावावर टी२०मध्ये ४ चेंडूत ४ विकेट्स घेण्याचा विक्रमही आहे.

२. मुजीब उर रहमान – किंग्ज इलेव्हन पंजाब

अफगाणिस्तानचा युवा गोलंदाज मुजीब उर रहमानही या हंगामात हॅट्रिक घेऊ शकतो. राशिदप्रमाणे तो देखील सीपीएलमध्ये सध्या खेळत आहे आणि तो जबरदस्त गोलंदाजी करत आहे. अद्याप कोणत्याही सीपीएल सामन्यात मुजीबने महागडी गोलंदाजी केली नाही तसेच त्याने बळीही मिळवले आहेत. युएईमध्ये खेळण्याचा त्याला चांगला अनुभवही आहे. त्याची गुगली गोलंदाजी ओळखणे सोपे नाही.

१. इम्रान ताहिर – चेन्नई सुपर किंग्ज

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज इम्रान ताहिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये हॅट्रिक विकेट्स घेतल्या आहेत. म्हणूनच त्यांच्यासाठी हॅट्रिक विकेट घेणे मोठी गोष्ट नाही. इम्रान ताहिर देखील सध्या सीपीएलमध्ये खेळत आहे.
आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने ५५ सामन्यांत ७९ बळी घेतले आहेत. यात १२ धावा देऊन ४ बळी मिळवणे ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

ट्रेंडिंग लेख –

फलंदाजीत अव्वल असणाऱ्या सचिन तेंडुलकरचे गोलंदाजीतील हे २ पराक्रम ऐकून आश्चर्य वाटेल!

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून फक्त १ सामना खेळणारे ३ भारतीय खेळाडू

वाढदिवस विशेष : क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये ‘फिनिशर’ शब्दाची परिभाषा बदलणारा लान्स क्लुसनर

महत्त्वाच्या बातम्या – 

पोलार्ड टी२०चा उत्तम खेळाडू, पण कसोटी क्रिकेट खेळण्यास योग्य नाही, पहा कोण म्हणलंय असं

आयसीसी टी-२० क्रमवारी: डेव्हिड मलान पहिल्या ५ मध्ये परतला, हाफिजलाही झाला फायदा

आयपीएल २०२०: सर्व संघांना दिले गेले ब्लूटूथ सक्षम बॅज; सर्व डेटा जाणार बीसीसीआयकडे


Previous Post

आजपासून इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु होणाऱ्या टी२० सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही

Next Post

मोठी बातमी: चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक धक्का, सुरेश रैनानंतर या खेळाडूने आयपीएलमधून घेतली माघार

Related Posts

Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

ऑस्ट्रेलियात ‘या’ गोष्टीचा फलंदाजी करताना झाला कायदा, वॉशिंग्टन सुंदरची प्रतिक्रिया

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter
क्रिकेट

“भारताविरुद्ध सलामी करणार का?,” डीकवेल्लाचा डॉम सिब्लीला प्रश्न, पाहा मजेशीर व्हिडिओ

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI & ICC
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

गावसकर यांनी केला खुलासा, भारताच्या मालिका विजयानंतर ब्रायन लारा मला मिठी मारत म्हणाले…

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

रिषभ पंत प्रत्येक मालिकेनंतर किट बॅग देतो ज्यूनियर क्रिकेटरला, त्यामागे ‘हे’ आहे खास कारण

January 27, 2021
Photo Curtsey: Facebook/Indian Cricket Team
क्रिकेट

भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंना चेन्नईला पोहचल्यानंतर ‘इतक्या’ दिवस रहावे लागणार क्वारंटाईन

January 27, 2021
क्रिकेट

अफलातून क्षेत्ररक्षक आणि उपयुक्त फलंदाज असूनही दुर्लक्षित राहिलेला मुंबईकर खेळाडू : रामनाथ पारकर

January 27, 2021
Next Post
Photo Courtesy: Facebook/TheChennaiSuperKings

मोठी बातमी: चेन्नई सुपर किंग्जला आणखी एक धक्का, सुरेश रैनानंतर या खेळाडूने आयपीएलमधून घेतली माघार

Photo Courtesy: Twitter/ ICC

वनडे क्रिकेटमध्ये १५ हजार धावांचा टप्पा पार करू शकतात सध्याचे ३ भारतीय फलंदाज

Photo Courtesy: Twitter/ ChennaiIPL

भारतात परतल्यानंतर सीएसकने रैनाला व्हॉट्सऍप ग्रुपमधून काढले; आता संघात पुनरागमन...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.