बुधवारपासून (दि. 16 ऑगस्ट) कॅरिबियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत धमाल करण्यासाठी भारतीय संघ आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचा माजी फलंदाज अंबाती रायुडू सज्ज झाला आहे. रायुडू अधिकृतरीत्या सेंट किट्स अँड पॅट्रियट्स या सीपीएल फ्रँचायझीमध्ये सामील झाला आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ट्रिस्टन स्टब्स याच्या जागी संघात घेतले आहे. स्टब्स स्पर्धेसाठी उपलब्ध नाहीये. अशात रायुडू या लीगमध्ये जोडला जाणारा दुसरा भारतीय बनला आहे. त्याच्यापूर्वी अनुभवी फिरकीपटू प्रवीण तांबे 2020मध्ये सीपीएलमध्ये सामील होणारा पहिला खेळाडू होता. मात्र, या लीगमध्येही रायुडूला भारतीय खेळाडूंची आठवण येत आहे.
‘पहिल्यांदाच भारतीय खेळाडूशिवाय ड्रेसिंग रूम शेअर करतोय’
फॅनकोडने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अंबाती रायुडू (Ambati Rayudu) म्हणाला की, “इथे येऊन खूपच चांगले वाटत आहे. ब्रावो आणि पोलार्ड सीपीएलबद्दल खूप जास्त चर्चा करतात. मला याबाबत एवढीच माहिती आहे. मी पहिल्यांदाच भारतीय खेळाडूशिवाय ड्रेसिंग रूम शेअर करत आहे. हा जरा विचित्र अनुभव आहे, पण इथे खूपच शानदार लोक आहेत.”
Ambati Rayudu is ready for the Caribbean party 🥳#CPL2023 #CPLonFanCode pic.twitter.com/1wEzuylsl3
— FanCode (@FanCode) August 19, 2023
Welcome to the biggest party in sport @RayuduAmbati as he talks about his signing with the @sknpatriots #CPL23 #AmbatiRatudu #CricketPlayedLouder #BiggestPartyInSport pic.twitter.com/0TMRynTU40
— CPL T20 (@CPL) August 19, 2023
भारतात खेळण्याचा वेगळा अनुभव
पुढे बोलताना रायुडू म्हणाला की, “भारतात खेळण्याचा एक वेगळाच अनुभव आहे. हे जरा नवीन आहे, पण मी याचाही आनंद घेत आहे. आम्ही एकदा इथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळण्यासाठी आलो होतो. आमचा येथील अनुभव खूपच चांगला राहिला आहे. सीपीएलशी जोडले जाणे माझ्यासाठी चांगली संधी आहे. माझा प्रवास 30 वर्षांपूर्वी सुरू झाला होता आणि मी या चढ-उतारांचा आनंद घेत आहे.”
मे महिन्यात घेतली होती निवृत्ती
अंबाती रायुडू याने भारतीय संघाकडून 55 वनडे आणि 6 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध रांची येथे 2019मध्ये खेळला होता. तसेच, यावर्षी आयपीएलमध्ये एमएस धोनी याच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना दिसला होता. आपल्या संघाला पाचवे आयपीएल विजेतेपद जिंकून दिल्यानंतर त्याने 29 मे रोजी आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. (cpl 2023 cricketer ambati rayudu missing indian players in st kitts nevis patriots dressing room)
महत्त्वाच्या बातम्या-
ज्याला म्हटलं मित्र, त्यानेच केला घात; म्हणाला, ‘बाबर आझमसोबतच्या मैत्रीमुळे माझंच नुकसान…’
आयर्लंडला मोठा धक्का! प्रमुख क्रिकेटरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, लगेच वाचा