---Advertisement---

7 षटकार 52 धावा, 273 चा स्ट्राईक रेट, मुंबईच्या माजी क्रिकेटरचा विध्वंसक अंदाज!

---Advertisement---

कॅरिबियन प्रीमियर लीग 2024 मधील 12 वा सामना खूपच रोमांचक ठरला. ज्यामध्ये त्रिनबागो नाईट रायडर्सने सेंट लुसिया किंग्जचा 5 चेंडू शिल्लक असताना 4 विकेटने पराभव करून मोसमातील आपला दुसरा विजय नोंदवला. पहिल्या डावातत खेळताना सेंट लुसिया किंग्ज संघाने 20 षटकांत 6 बाद 187 धावा केल्या. प्रत्युत्तरात त्रिनबागो नाईट रायडर्स संघाने 19.1 षटकांत 189/6 धावा करून सामना जिंकला. त्रिनबागो नाईट रायडर्सचा कर्णधार कायनन पोलार्डला (52* आणि 19 चेंडूत 1/22) सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या सेंट लुसिया किंग्जची सुरुवात चांगली झाली. कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि जॉन्सन चार्ल्स यांनी 40 धावा जोडल्या. चार्ल्सने 14 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 29 धावांची खेळी केली. तर फॅफच्या बॅटमधून 26 चेंडूत 34 धावा आल्या. मधल्या षटकांमध्ये रोस्टन चेसने एक टोक सांभाळत शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने 40 चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 56 धावा केल्या. भानुका राजपक्षेने 29 चेंडूत 33 धावा केल्या तर टीम सेफर्ट आणि मॅथ्यू फोर्डने प्रत्येकी 11 धावा केल्या. त्रिनबागो नाईट रायडर्सकडून सुनील नारायण आणि वकार सलामखिल यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले.

लक्ष्याचा पाठलाग करताना त्रिनबागो नाईट रायडर्सला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला आणि सुनील नरेन 8 चेंडूत 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. शकेरे पॅरिसने शानदार खेळी करत 33 चेंडूत एक चौकार आणि सहा षटकारांसह 57 धावा केल्या. मात्र, जेसन रॉय धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसला. त्याने 15 चेंडूत केवळ 16 धावा केल्या. निकोलस पूरनही काही विशेष करू शकला नाही. तो 12 चेंडूत 17 धावा करूनल परतला. सामना टिकेहारच्या हातातून जाईल असे वाटत होते पण कर्णधार पोलार्डने तसे होऊ दिले नाही आणि त्याने आपल्या जुन्या शैलीत फलंदाजी करत 19 चेंडूत नाबाद 52 धावा करून आपल्या संघाला चांगली साथ दिली. त्याच्या खेळीत सात षटकारांचा समावेश होता.

हेही वाचा-

ग्रेटर नोएडा स्टेडियमची व्यवस्था बेकार; बीसीसीआय नावालाच श्रीमंत बोर्ड? चाहत्यांचा आक्रोश!
आयपीएल संघांवर सायबर हल्ला, दिल्ली कॅपिटल्सनंतर या फ्रँचायझीचे ‘एक्स’ अकाउंट हॅक!
Diamond League; नीरज चोप्रा पुन्हा ॲक्शनमध्ये, यंदा सुवर्णपदकाचा मार्ग मोकळा..!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---