---Advertisement---

फलंदाजासह प्रत्येकाला वाटलं चेंडू जाईल बाउंड्री पार, तितक्यात क्षेत्ररक्षणाने टिपला ‘कडक झेल’

On: गुरूवार, सप्टेंबर 2, 2021 1:24 PM
---Advertisement---

टी२० क्रिकेटमध्ये नेहमीच खेळाडूंचे चांगेल प्रदर्शन दिसते. यामध्ये एकापेक्षा एक अप्रतिम झेल दिसतात. यामध्ये काही झेल असेही असतात, ज्यांना पाहून स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. वेस्टइंडीजमध्ये सुरू असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये असाच एक झेल पाहायला मिळाली आहे. हा झेल पाहून फलंदाजासह गोलंदाजी करणाऱ्या संघाचे प्रशिक्षकही हैराण झाले आहेत. हा अप्रतीम झेल पकडला आहे, त्रिनबागो नाइट रायडर्सचा खेळाडू अखिल हुसेन याने.

अखिलने सीमारेषेवर उंच उडी मारत हा झेल पकडला आहे. त्याने पकडलेला झेल पाहून गयाना अमेजॉन वाॅरियर्स संघाचा कर्णधार निकोलस पूरनसुद्धा दंग झाला होता. दरम्यान सोशल मीडियावर त्याने घेतलेल्या या झेलाचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे.

तर झाले असे की, गयाना संघाचा कर्णधार निकोलस पूरन १४ चेंडूत २७ धावांवर फलंदाजी करत होता. रवी रामपालच्या १८ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पूरनने मोठा शाॅट खेळण्याचा प्रयत्न केला. त्याने खेळलेल्या शाॅटमध्ये बॅट आणि चेंडू यांच्यातला संपर्कही चांगला होता. मात्र, सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या अखिल हुसेनने हवेत उडी मारून त्याने मारलेला चेंडू झेलला. हा चेंडू सहज सीमारेषेच्या पलीकडे गेला असता, पण अखिलने मारलेल्या उडीमुळे पूरनच्या डावाचा शेवट झाला.

https://twitter.com/CPL/status/1433120406513147904?s=20

त्याने पकडलेला हा झेल पाहून दयावा अमेजॉन वाॅरीयर्सचा कर्णधार पूरनला विश्वासच बसला नव्हता. तसेच सहकारी खेळाडू आणि प्रशिक्षकही अखिलच्या या उत्तम क्षेत्ररक्षणामुळे हैराण झालेले दिसले. हा अप्रतिम झेल घेतल्यानंतर अखिल हुसेन आनंद साजरा करतानाही दिसला.

https://twitter.com/CPL/status/1433120614164934660?s=20

कायरन पोलार्ड आणि निकोलस पूरन यांच्या नेतृत्वातील संघांमध्ये खेळला गेलेला हा सामना खूप रोमांचक झाला. सुरुवातीला सामना बरोबरीत सुटल्याने शेवटी एक सुपर ओव्हर झाली. त्रिनबागो नाइट रायडर्सने प्रथम फलंदाजी करत ९ विकेट्स गमावत १३८ धावा केल्या होत्या. त्यानंतर विरोधी संघाने ९ विकेट्स गमावत तेवढ्याच धावा केल्या होत्या. सामन्यातील सुपर ओव्हरमध्ये रोमॅरिओ शेफर्डच्या चांगल्या गोलंदाजीमुळे गयाना अमोजॉन वॉरियर्सने हा सामना जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या

ओव्हल कसोटीत घुमणार बूम बूमचा बुमरँग! ३ विकेट्स घेत ‘या’ महान वेगवान गोलंदाजाला पछाडणार

भारतासाठी डोकेदुखी ठरलेल्या रूटला बाद करण्याची ट्रिकही मिळाली आणि गोलंदाजही गवसला, आता फक्त…

ओव्हलवर हॅट्रिक घेणारा ‘हा’ फिरकीपटू अश्विनला न खेळवल्याने थक्क, पण पहिली पसंती मात्र जडेजाला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---