---Advertisement---

IND vs ENG: जे कोणी करू शकलं नाही, ते क्रॉली आणि डकेटने करून दाखवलं! दोन्ही खेळाडूंनी रचला इतिहास

On: शुक्रवार, ऑगस्ट 1, 2025 6:10 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 23 जुलैपासून सुरू झाला आहे. इंग्लंडकडून झॅक क्रॉली (Jack Krauli) आणि बेन डकेट (Ben Duckket) यांनी संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. अवघ्या 10 षटकांमध्ये इंग्लंडने कोणतीही विकेट न गमावता 71 धावा केल्या. या दोघांनी पुन्हा एकदा दमदार सुरुवात करून भारतीय संघाला दबावाखाली आणले. याच कामगिरीसह क्रॉली आणि डकेटने इंग्लंडसाठी इतिहास रचला आहे.

क्रॉली आणि डकेट यांनी अर्धशतकी भागीदारी करत एक विक्रम केला आहे. भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून सलामी जोडीने सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे. या दोघांनी भारताविरुद्ध 8 वेळा अर्धशतकी भागीदारी केली आहे.

याआधी हा विक्रम इंग्लंडचे एलिस्टर कुक आणि अँड्र्यू स्ट्रॉस यांच्या नावावर होता. त्यांनी भारताविरुद्ध 7 वेळा 50+ भागीदाऱ्या केल्या होत्या. मात्र आता क्रॉली आणि डकेटने त्यांना मागे टाकलं आहे. इतकंच नाही तर, वेस्टइंडीजकडून गॉर्डन ग्रीनिज आणि डेसमंड हेन्स यांनी भारताविरुद्ध 8 वेळा अर्धशतकी ओपनिंग भागीदारी केली होती. आता क्रॉली आणि डकेट यांनी त्यांच्याशी बरोबरी केली आहे.

ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू हेडन व जस्टिन लँगर, तसेच बिल लॉरी आणि बॉब सिम्पसन यांनी 7 वेळा भारताविरुद्ध अर्धशतकी सलामी भागीदाऱ्या केल्या होत्या.

भारताविरुद्ध कसोटीमध्ये सलामी जोडीकडून सर्वाधिक 50+ भागीदाऱ्या

झॅक क्रॉली & बेन डकेट (इंग्लंड 8*)
गॉर्डन ग्रीनिज & डेसमंड हेन्स (वेस्टइंडीज 8)
एलिस्टर कुक & अँड्र्यू स्ट्रॉस (इंग्लंड 7)
मॅथ्यू हेडन & जस्टिन लँगर (ऑस्ट्रेलिया 7)
बिल लॉरी & बॉब सिम्पसन (ऑस्ट्रेलिया 7)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---