---Advertisement---

5 दिग्गज खेळाडू ज्यांना संघातून कधीही वगळण्यात आले नाही

On: शनिवार, सप्टेंबर 21, 2024 8:47 AM
---Advertisement---

आपल्या देशासाठी संघाचे दीर्घकाळ प्रतिनिधित्व करण्याचे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते.पण हे शक्य होणे खूप कठीण आहे. कारण प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत चांगले आणि वाईट टप्पे असतात. ज्यादरम्यान अनेक वेळा खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जातो.  प्रसंगी अनेक खेळाडूंचे मनोधैर्य खचून जाते. मग त्यांना माघारी परतणे कठीण होऊन बसते.

तर दुसरीकडे अनेक खेळाडू कठोर परिश्रम करतात आणि संघात जोरदार पुनरागमन करतात आणि वर्चस्व गाजवतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत. ज्यांना संघातून कधीही वगळण्यात आले नाही. या बातमीद्वारे आपण अशाच पाच खेळाडूंबद्द बोलणार आहेत.

5. सुनील गावस्कर
भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांची गणना जगातील महान खेळाडूंमध्ये केली जाते, त्यांच्या नावावर अनेक मोठे विक्रम आहेत. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडनंतर भारतासाठी कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये तो दुखापतीमुळे चार सामन्यांमधून बाहेर होता. तर काही एकदिवसीय सामन्यांमध्ये विश्रांती देण्यात आली होती. गावस्कर यांना कधीही संघातून वगळण्यात आले नाही.

4. ॲडम गिलख्रिस्ट
ॲडम गिलख्रिस्टसारखा चपळ यष्टीरक्षक फलंदाज जगात कदाचित दुसरा कोणी नसेल. धोकादायक विकेटकीपिंगसोबतच तो गोलंदाजांवर तुटून पडण्यात ओळखला जात असे. या 52 वर्षीय खेळाडूने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 396 सामने खेळले आणि 16 हजारांहून अधिक धावा केल्या. गिलख्रिस्टला कधीही संघातून वगळण्यात आले नाही.

3. एमएस धोनी
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावाचाही यामध्ये समावेश आहे. धोनीने आपल्या नेतृत्वाखाली भारताला टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकून दिला. विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या खेळाडूंना यशस्वी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. धोनीला संघातून कधीच वगळण्यात आले नाही.

2. जॅक कॅलिस
दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 25 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत आणि 500 ​​हून अधिक बळीही घेतले आहेत. त्याच्यासारखा यशस्वी अष्टपैलू क्रिकेट विश्वात पुन्हा दिसणार नाही. कॅलिसला कोणत्याही कारणास्तव संघातून वगळण्यात आले नाही.

1. सचिन तेंडुलकर
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 24 वर्षे चालली. या काळात त्यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले. जे आजही कायम आहेत. सचिनला त्याच्या कामाचा भार हाताळण्याच्या उद्देशाने अनेक विश्रांतीचा कालावधी देण्यात आला होता. परंतु त्याला संघातून कधीही वगळण्यात आले नाही.

हेही वाचा-

बर्थडे बॉय राशिद खानचा विश्वविक्रम! 53 वर्षांच्या वनडे इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज
 ‘रशीद’ आणि ‘गुरबाज’समोर आफ्रिकन संघाचे लोटांगण, अफगाणिस्तानने रचला इतिहास; मालिका ताब्यात
विराट कोहलीची शतकाची भूक संपली! शेवटची सेंच्युरी कधी केलीय?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---