काही दिवसापूर्वी आयसीसीने दशकातील सर्वोत्तम वनडे, टी२० आणि कसोटी संघाची घोषणा केली आहे. यामध्ये भारतीय खेळाडूंनी बाजी मारलेली दिसून येत आहे. त्याचबरोबर एमएस धोनीला वनडे आणि टी-20 संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. तसेच विराट कोहलीला कसोटी संघाचे नेतृत्व दिले आहेत. त्यामुळे सध्या खूप चर्चा होत आहे. माजी खेळाडू आकाश चोप्राने धोनीला आयसीसीने दशकातील सर्वोत्तम टी-20 संघात स्थान देण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
आयसीसीने 2011-2020 या दशकातील सर्वोत्तम तीन संघाची निवड केली आहे. ज्यामधे 10 वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे.
भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने, आयसीसीने जाहीर केलेल्या टी-20 संघावर आणि त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचबरोबर त्यांनी भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याचा टी-20 संघात समावेश केल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याचबरोबर त्यांनी टी-20 संघात जोस बटलरचा समावेश केला नसल्याने त्यावर सर्वांचे लक्ष वेधले आहे.
टी-20 संघातून जोस बटलरचे नाव गायब
आयसीसीने जाहीर केलेल्या दशकातील सर्वोत्तम टी-20 संघाबद्दल बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, “मी थोडा आश्चर्यचकित झालो आहे. कारण तुम्ही दशकातील सर्वोत्तम कामगिरी बोलत असाल तर यामध्ये न भारताने काही जिंकले आहे, न एमएस धोनीने चांगली कामगिरी आहे. आपण एक टी-20 संघ बनवत आहात आणि यामधे जोस बटलर सारखाच खेळाडू नाही. जर मागील दहा वर्षातील धोनीची टी-20 कामगिरी बघितले. तर त्याने 73 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामधे धोनीने 1176 धावा केल्या आहेत. त्याने 45.23 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वाधिक धावसंख्या 56 आहे.”
आयसीसीची दशकातील सर्वोत्तम टी-20 संघ
रोहित शर्मा, ख्रिस गेल, महेंद्र सिंग धोनी (कर्णधार), विराट कोहली, एराॅन फिंच, एबी डिविलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, कायरण पोलार्ड, राशीद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा
महत्त्वाच्या बातम्या –
गुडबाय २०२० : यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे ‘हे’ आहेत टॉप ५ क्रिकेटपटू
क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी! २०२१ मध्ये टीम इंडिया खेळणार ‘एवढ्या’ मालिका
गुडबाय २०२० : यावर्षी कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे ‘हे’ आहेत ६ गोलंदाज