---Advertisement---

कोरोना व्हायरसविरुद्ध लढ्यात क्रिकेटपटूंना इंंन्शुरन्स देणार हे देशातील पहिलं राज्य

On: सोमवार, मार्च 23, 2020 4:20 PM
---Advertisement---

सध्या कोरोना व्हायरसचा उद्रेक पहाता बंगाल क्रिकेट असोसिएशनने (कॅब) त्यांच्या खेळाडूंना आणि आधिकाऱ्यांना आश्वासन दिले आहे की त्यांना विमा पॉलिसीचे संरक्षण दिले जाईल.

स्पोर्ट्सस्टारने दिलेल्या वृत्तानुसार कॅबचे प्रमुख अविषेक दालमिया यांनी सांगितले की कॅबच्या विमा पॉलिसीमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या डिव्हीजनच्या स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंसह ३२०० जणांचा हॉस्पिटलचा खर्चदेखील सामाविष्ट आहे. तसेच त्यांनी सांगितले की कॅब त्यांचे खेळाडू, स्कोअरर आणि पंचांसह या कठीण काळात कायम बरोबर आहेत.

तसेच बंगालकडून खेळत असलेल्या सर्व महिला क्रिकेटपटू आणि वरिष्ठ बंगाल पुरुष संघाकडून खेळलल्या सर्व माजी खेळाडूंचाही या विम्यामध्ये समावेश असल्याचे दालमिया यांनी सांगितले आहे.

त्याचबरोबर कॅबचे सचिव देबब्रता दास यांनी माहिती दिली आहे की कॅबचे सर्व कर्मचारी घरी राहुन काम करत आहे.

ट्रेंडिग घडामोडी- 

-टॉप ५: वनडेत सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू

–टॉप ५: सर्वाधिक काळ वनडे क्रिकेट खेळलेले खेळाडू !

–१९९८च्या आयसीसी वनडे क्रमवारीतील टॉप १० खेळाडू पाहून व्हाल थक्क

–या १० महान खेळाडूंवर विश्वचषक कायम रुसलाच

–गांगुलीला २००३च्या क्रिकेट विश्वचषकात हवा होता धोनी!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---