---Advertisement---

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केला वार्षिक करार, बड्या खेळाडूंना मिळाला डच्चू

On: शुक्रवार, एप्रिल 23, 2021 7:42 PM
---Advertisement---

बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच खेळाडूंसाठीच्या आपल्या वार्षिक कराराची घोषणा केली होती. त्यांच्या पाठोपाठ आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देखील ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठीचा वार्षिक करार जाहीर केला आहे. या करारात त्यांनी अनेक धक्कादायक निर्णय घेतले. वार्षिक करारातील एकूण खेळाडूंची संख्या तर त्यांनी कमी केलीच आहे. त्याशिवाय अनेक बड्या खेळाडूंना या करारातून डच्चू देखील दिला आहे.

केवळ १७ खेळाडूंना वार्षिक करारात स्थान
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वार्षिक करारातील खेळाडूंच्या संख्येत कपात करण्याचा निर्णय घेतला. वार्षिक कराराच्या यापूर्वीच्या यादीत २० खेळाडूंचा समावेश होता. मात्र यावेळी केवळ १७ खेळाडूंना वार्षिक करारात स्थान मिळाले आहे. याशिवाय मागील यादीतील काही बड्या खेळाडूंना देखील यावेळी वगळण्यात आले आहे.

यष्टीरक्षक-फलंदाज मॅथ्यू वेड आणि डावखुरा फलंदाज ट्रॅव्हिस हेड या खेळाडूंना या यादीतून वगळण्यात आले आहे. याशिवाय सलामी फलंदाज जो बर्न्स, अष्टपैलू मिचेल मार्श आणि मार्कस स्टॉयनिस यांना देखील वार्षिक करारातून डच्चू मिळाला आहे. मात्र भारताविरुद्धच्या मालिकेत पदार्पण करणार्‍या युवा कॅमरुन ग्रीनला पहिल्यांदाच करारबद्ध खेळाडूंमध्ये समाविष्ट केले गेले आहे.

या कराराबाबत बोलतांना ऑस्ट्रेलियाचे निवड समिती प्रमुख ट्रेवर हॉन्स म्हणाले, “आज ज्या १७ खेळाडूंचा समावेश वार्षिक करारात करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली, त्या सगळया खेळाडूंवर आमचा पूर्ण विश्वास आहे. ऑस्ट्रेलियन पुरुष संघाचे येत्या सत्रात तीनही प्रकाराच्या क्रिकेटच्या स्वरूपात अतिशय व्यग्र वेळापत्रक आहे. आम्ही त्या दृष्टीने नियोजन करत आहोत.” ऑस्ट्रेलियन संघाला येत्या सत्रात भारतात होणारा टी२० वर्ल्डकप खेळायचा आहे. तसेच त्यानंतर मायदेशात इंग्लंडविरुद्ध अ‍ॅशेस मालिका देखील खेळायची आहे.

ऑस्ट्रेलियाच्या वार्षिक करारात स्थान मिळालेले खेळाडू –
अ‍ॅश्टन अगर, अलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, अॅरोन फिंच, कॅमरुन ग्रीन, जोश हॅजलवूड, मार्नस लॅब्यूशेन, नॅथन लॉयन, ग्लेन मॅक्सवेल, टीम पेन, जेम्स पॅटिन्सन, जाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! राजस्थानला आणखी एक मोठा धक्का; स्टोक्सपाठोपाठ हा प्रमुख खेळाडूही आयपीएलमधून बाहेर

PBKS vs MI Live: पंजाब संघाने नाणेफेक जिंकून घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय; विजयी मार्गावर परतण्यासाठी दोन्ही संघ आतुर

धोनी पाठोपाठ कोहलीची देखील क्रेझ! राजस्थानच्या खेळाडूने सामना संपल्यावर घेतला ऑटोग्राफ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---