Loading...

या संघाला खेळायचे आहेत भारताविरुद्ध दोन दिवस-रात्र कसोटी सामने…

2020-2021मध्ये भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) बीसीसीआयला (BCCI) एकापेक्षा अधिक दिवस-रात्र कसोटी (Day-Night Test Match) सामने खेळण्याची विनंती करण्याची शक्यता आहे.

Loading...

पुढील वर्षी जानेवारीत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणार्‍या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेदरम्यान दोन्ही देशाच्या क्रिकेट मंडळाचे दोन्ही अधिकारी भेटतील, तेव्हा या कसोटी मालिकेच्या रूपरेषावर चर्चा होईल.

ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, कोलकाता (Kolkata) येथे बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) पहिल्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताच्या विजयानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया या प्रस्तावासाठी उत्सुक आहे.

पुढीलवर्षी 14 जानेवारीपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू होणार्‍या 3 वनडे सामन्यांच्या मालिकेदरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष अर्ल एडिंग्स (Earl Eddings) यांच्या नेतृत्वात एक प्रतिनिधीमंडळ बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.

Loading...

“भारताने पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळला आहे. आता ते या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी तयार असतील. मला खात्री आहे की ते अधिक दिवस-रात्र कसोटी सामने खेळतील. आम्ही जानेवारीत त्यांची वाट बघू,” असे एडिंग्ज म्हणाले.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाची (Cricket Australia) अशी इच्छा आहे की बीसीसीआयने 2020-2021 दरम्यान होणाऱ्या कसोटी मालिकेत आणखी एक कसोटी सामना समाविष्ट करावा, असे एडिंग्ज म्हणाले.

“आम्हाला भारताविरुद्ध 5 कसोटी सामने (5 Test Matches Against India) खेळायचे आहेत. भविष्यात असे होईल अशी आशा आहे,” असेही एडिंग्ज म्हणाले.

Loading...

“भारताने दिवस-रात्र कसोटी खेळण्यास सहमती दर्शविली आहे, ही चांगली गोष्ट आहे. यावरून हे सिद्ध होते की सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) खेळाची काळजी आहे. बीसीसीआयच्या नवीन प्रशासनाशी बोलण्यासाठी मी जानेवारीत आमच्या बोर्डाच्या काही सदस्यांसमवेत या विषयावर चर्चा करण्यासाठी भेटेल,” असे एडिंग्ज यावेळी म्हणाले.

You might also like
Loading...