---Advertisement---

भारताला फायद्याची व इतरांना महागात पडलेली आयसीसीची चुक या विश्वचषकात होणार नाही

---Advertisement---

पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी२० (Men’s World Cup) विश्वचषकाला १८ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र यावर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टी२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलिया राखीव दिवस ठेवण्याचा प्रस्ताव ठेवू शकतो. ज्यामध्ये अंतिम सामन्यापूर्वी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आला नाही.

यावर्षाच्या सुरुवातीला झालेल्या महिला आंतरराष्ट्रीय टी२० विश्वचषकाच्या बाद फेरीत आयसीसीने राखीव दिवस ठेवला नव्हता. त्यामुळे आयसीसीला टीकांना सामोरे जावे लागले होते.

भारताविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडला या स्पर्धेतून बाहेर जावे लागले होते. त्यामुळे अ गटातील भारतीय संघाकडे अधिक गुण असल्यामुळे भारताला अंतिम सामन्यात प्रवेश मिळाला होता.

आयसीसी क्रिकेट समितीच्या (ICC Cricket Committee) यावर्षात होणाऱ्या बैठकीत राखीव दिवसाबद्दल चर्चा करण्यात येईल. आयसीसी बोर्डाचे सदस्य जर खेळाच्या अटींमध्ये काही बदल करणार असतील तर या बैठकीत राखीव दिवसाबद्दल चर्चा करण्यात येईल.

ट्रेंडिंग घडामोडी-

-३८ वर्षीय ३ खेळाडू जे करु शकतात आयपीएलमध्ये धमाका

-तीने माझं फेसबुक अकाऊंट हॅक केलं, तेव्हापासून मी एफबी वापरणं सोडलं

-आयपीएलमधून सर्वाधिक कमाई करणारे टाॅप ५ खेळाडू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---