वर्ष २०२१ समाप्त व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. गुरुवारी (३० डिसेंबर) या वर्षातील शेवटचा कसोटी सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका (India and South Africa) या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ११३ धावांनी विजय मिळवला. हा सामना झालंल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंची कसोटी प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. कोणत्या खेळाडूंना या प्लेइंग इलेव्हेनमध्ये स्थान मिळाले आहे, चला पाहूया.(Test playing 11 by cricket Australia)
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेल्या या प्लेइंग इलेव्हनमध्ये एकमात्र ऑस्ट्रेलियन खेळाडू मार्नस लॅब्यूशेनला (Marnus labhuchagne) स्थान देण्यात आले आहे, तर श्रीलंका संघाचा सलामीवीर फलंदाज दिमुथ करुणारत्नेला या संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.
या प्लेइंग इलेव्हनमध्ये ४ भारतीय, ३ पाकिस्तानी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका संघातील प्रत्येकी १-१ खेळाडूला स्थान देण्यात आले आहे. या संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी युवा रिषभ पंतलाा(Rishabh pant) देण्यात आली आहे, ज्याने वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध दमदार कामगिरी केली होती.
तसेच या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिषभ पंत सह, दिग्गज फिरकीपटू आर अश्विन (R ashwin), सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलची (Axar Patel) निवड करण्यात आली आहे.
पाकिस्तान संघातून फवाद आलम, हसन अली आणि शाहीन शाह आफ्रिदी यांना संधी देण्यात आली आहे. तसेच इंग्लंड संघाकडून जो रूट, न्यूझीलंड संघाकडून काईल जेमिसन, श्रीलंका संघाकडून दीमुथ करुणारत्ने आणि ऑस्ट्रेलिया संघाकडून मार्नस लॅब्यूशेनची निवड करण्यात आली आहे. सर्व खेळाडूंनी आपल्या संघासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन
सलामीवीर फलंदाज – रोहित शर्मा, दिमुथ करुणारत्ने (कर्णधार)
मधल्या फळीत फलंदाज – मार्नस लॅब्युशेन, जो रूट आणि फवाद आलम
यष्टिरक्षक – रिषभ पंत
अष्टपैलू खेळाडू – काईल जेम्सन, आर अश्विन आणि अक्षर पटेल
गोलंदाज – हसन अली आणि शाहीन आफ्रिदी
महत्वाच्या बातम्या :
केएल राहुलने सांगितली राज की बात! फलंदाजीत ‘हा’ बदल केल्याने मिळाले यश
तब्बल १ तास स्टीव्ह स्मिथ अडकला लिफ्टमध्ये, लॅब्युशेनने फटीतून दिले खायला, पाहा व्हिडिओ
हे नक्की पाहा :