---Advertisement---

सौरव गांगुलीच्या या प्रस्तावाचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून कौतुक

---Advertisement---

क्रिकेट विश्वात बऱ्याच वेळा कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून एखाद्या खेळाडूची प्रशंसा केली जाते. अशीच काही प्रशंसा वनडे सुपर सीरिजच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळाली.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन राॅबर्ट्स यांनी चार देशांच्या ‘वनडे सुपर सीरिज’वर दिलेल्या सल्ल्यासाठी बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीची (Sourav Ganguly)  प्रशंसा केली आहे.

भारतीय संघ 2021मध्ये सुरू होत असलेल्या वार्षिक वनडे मालिकेत इंग्लंड (England), ऑस्ट्रेलिया (Australia) आणि आणखी एका आघाडीच्या संघाबरोबर खेळेल, असे गांगुली म्हणाला होता. परंतु अद्याप त्याने दिलेला हा सल्ला अंमलात आणण्याचे आश्वासन दिलेले नाही.

लंडनमध्ये गांगुलीशी झालेल्या बैठकीनंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (England And Wales Criket Board) या विषयावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले होते.

“बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची ही अनोखी विचारसरणी आहे,” असे  रॉबर्ट्स म्हणाले.

“त्यांच्या संक्षिप्त कार्यकाळात दिवस-रात्र कसोटी (Day-Night Test) सामना कोलकाता येथे पार पडला. त्याचा निकालही उत्तम ठरला. आता सुपर सिरीजचा प्रस्तावही चांगला आहे,” असेही राॅबर्ट्स यावेळी म्हणाले.

रॉबर्ट्स म्हणाले की ते पुढील महिन्यात भारत आणि बांगलादेशमध्ये (Bangladesh) भविष्यातील क्रिकेटच्या वेळापत्रकावर बोलण्यासाठी येतील. त्यांनी न्यूझीलंड (New Zealand) आणि पाकिस्तानशी (Pakistan) भविष्यातील कार्यक्रमाबद्दल चर्चा केली आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

https://twitter.com/Maha_Sports/status/1210563784927895552

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---