---Advertisement---

बीसीसीआयमुळेच झालं शक्य ! क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले वनडे सामन्यांच्या यशस्वी आयोजनाचे श्रेय

On: बुधवार, डिसेंबर 2, 2020 2:29 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 27 नोव्हेंबरपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली. कोरोना विषाणूच्या महामारीदरम्यानही दोन वनडे सामन्यांचे आयोजन करण्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाला यश आले. मात्र, चॅनेल सेव्हन या प्रसार माध्यमाने केलेल्या आरोपामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आणि या मालिकेच्या यशस्वी आयोजनाबद्दल भाष्य केले आहे.

चॅनल सेव्हनने केले होते आरोप

चॅनल सेव्हनने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यात असे म्हटले होते की, “बीसीसीआयच्या हिताच्या अनुषंगाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मालिकेचे वेळापत्रक बदलून प्रसारण कराराचे उल्लंघन केले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया बीसीसीआयला घाबरते.”

“फॉक्सटेल आणि राज्य सरकारमधील ईमेलविषयी माहिती आम्हाला हवी आहे”, अशीही मागणी चॅनल सेव्हनने केली होती.

दिवस-रात्र कसोटीने दौऱ्याची होणार होती सुरुवात – वारबर्टन

सेव्हन वेस्ट मिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स वारबर्टन यांनी म्हटले होते की, “दिवस- रात्र कसोटी सामन्याने भारत दौऱ्याची सुरुवात होणार होती. मात्र त्याआधी वनडे आणि टी20 मालिकेचे आयोजन करण्यात आले.”

हे अत्यंत निराशाजनक – हॉक्ले

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अंतरीम सीईओ हॉक्ले यांनी क्रिकेटवर्ल्ड डॉट कॉमवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये सकारात्मकता आहे. सेव्हन वेस्ट माध्यमांनी आमच्या सर्वोत्कृष्ट खेळाची बदनामी करण्यासाठी माध्यमांमध्ये भाष्य केले होते. हे अतंत्य निराशाजनक आहे.”

बीसीसीआयमधील मित्रांच्या साहाय्याने ठरलो यशस्वी

वनडे मालिकेच्या यशस्वी आयोजनाबद्दल बोलताना मॅक्ले म्हणाले की, “क्रीडा जगतातील हा सर्वात आव्हानात्मक काळ आहे. बीसीसीआयमधील आमच्या काही मित्रांच्या पाठिंब्याने आम्ही भारताविरुद्धची ही मालिका आयोजित करण्यात यशस्वी ठरलो.”

बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेबद्दल प्रेक्षक उत्साही

“भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये दर्शकसंख्येने विक्रम नोंदवला. त्यामुळे हे सिद्ध होते की बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेबद्दल प्रेक्षक किती उत्साहित असेल,”असेही पुढे बोलताना मॅक्ले म्हणाले.

चॅनेल सेव्हनचे मानले आभार

चॅनेल सेव्हनचे अभिनंदन करताना मॅक्ले म्हणाले की, “आम्ही चॅनल सेव्हनच्या क्रिकेट आणि प्रसारण संघाचा आदर करतो आणि क्रिकेट रेटिंगमध्ये वाढ झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. आम्ही आमचे भागीदार आणि सहकार्‍यांच्या पाठिंब्याने येत्या हंगामात अशाच प्रकारच्या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करू.”

महत्त्वाच्या बातम्या –

गोलंदाजांसाठी ‘ती’ बाब सोपी नाही, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खराब कामगिरीनंतर अय्यरची पाठराखण

भारताकडून वनडेत २०२०मध्ये सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू

रवींद्र जडेजाचा ऑस्ट्रेलियामध्ये नवा रेकॉर्ड; ‘या’ दिग्गजांना टाकले मागे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---