---Advertisement---

ऑस्ट्रेलियन क्रिकेट वर्तुळात उडाली खळबळ! बॉल टेम्परिंग प्रकरणाची होऊ शकते पुन्हा चौकशी

On: शनिवार, मे 15, 2021 11:40 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू कॅमेरून बेनक्रॉफ्टच्या खुलाश्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये (सीए) खळबळ उडाली आहे. बेनक्रॉफ्टने म्हटले आहे की, बॉल टेम्परिंगच्या घटनेची माहिती ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना होती. मात्र, सीएच्या तपासात तीन लोक दोषी आढळले आणि त्या सर्वांवर बंदी घातली गेली होती. परंतु, त्यामध्ये कोणताही गोलंदाज सामील नव्हता. बेनक्रॉफ्टच्या विधानानंतर सीए पुन्हा एकदा या प्रकरणाची चौकशी करू शकते.

हे गोलंदाज होते सामील
सन २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध केपटाउन येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात कॅमेरून बेनक्रॉफ्ट कॅमेऱ्यामध्ये चेंडूवर सॅंडपेपर घासताना पकडला गेला होता. यानंतर त्याच्यावर नऊ महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. कर्णधार स्टीव स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरही दोषी आढळले. या दोन खेळाडूंवर एक वर्षाची बंदी घातली गेलेली. यानंतर स्टीव स्मिथला कर्णधारपद तर वॉर्नरला उपकर्णधारपदही गमावावे लागले.

त्यानंतर, आजही स्मिथला कर्णधारपद मिळालेले नाही. त्या सामन्यात मिचेल स्टार्क, जोस हेझलवुड, पॅट कमिन्स, नॅथन लियोन आणि मिचेल मार्श हे गोलंदाज खेळले होते. अशा परिस्थितीत हे सर्व संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कमिन्स हा सध्या कसोटी क्रमवारीत जगातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आहे आणि आयपीएलमध्ये केकेआर संघासाठी खेळतो.

दिग्गजांनी केलेली चौकशीची मागणी
फॉक्स क्रिकेटशी बोलताना सीएचे प्रवक्ते म्हणाले की, “नवीन माहिती महत्वाची आहे. या प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू होऊ शकते. सीएने नेहमीच म्हटले आहे की २०१८ केपटाऊन कसोटीबद्दल कोणाकडे काही नवीन माहिती असल्यास त्यांनी पुढे येऊन ती सादर करावी. त्यावेळी या प्रकरणाचा सविस्तर तपास करण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत सीएला कुणीही नवीन माहिती दिली नाही, जेणेकरून त्यावर शंका येऊ शकेल.”

ऑस्ट्रेलियाचे तीन माजी खेळाडू इयान चॅपल, इयान हिली आणि मार्क टेलर यांनी २०१९ मध्ये सीएच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह लावून म्हटले होते की बरेच लोक यात सामील होऊ शकतात. बेनक्रॉफ्टच्या विधानाने आता हे सिद्ध झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“करारबद्ध खेळाडू असताना बीसीसीआयने वेदाशी कोणताही संपर्क साधलेला नाही”, लिसा स्थळेकरने फटकारले

जोफ्रा आर्चरच्या घातक बाऊन्सरने फलंदाज कोसळला जमिनीवर, पाहा व्हिडिओ

कोरोना विरोधी लढ्यासाठी इरफान पठाणचा पुन्हा पुढाकार! ‘ही’ संपूर्ण कमाई करणार दान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---