---Advertisement---

व्हाईट बॉलमध्ये वॉर्नर-स्टॉयनिस, तर कसोटीत स्मिथ बनला प्लेअर ऑफ द ईयर, महिलांमध्ये बेथ मुनीने सर्वोत्तम

On: मंगळवार, जानेवारी 31, 2023 1:20 PM
Steve Smith Beth Mooney
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दिग्गज स्टीव स्मिथ पुन्हा एकदा एलन बॉर्डर पदक जिंकला आहे. सोमवारी () क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2022 मध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या त्यांच्या खेळाडूंना सन्मानित केले. स्मिथने मानाचे एलन बॉर्डर पदक नावावर केले आणि माजी दिग्गज कर्णधार रिकी पॉंटिंग आणि मायकल क्लार्क यांची बरोबरी साधली. या तिघांनीही प्रत्येकी चार वेळा एलन बॉर्डर मेडल जिंकले आहे. तसेच महिलांमधील बेथ मुनी हिने बेलिंडा क्लार्क पुरस्कार जिंकला. क्रिकेट कारकिर्दीतील हा बेथ मुनीचे दुसरे बेलिंडा क्लार्क पदक ठरले.

स्टीव स्मिथ (Steve Smith ) आणि बेथ मुनी (Beth Mooney) यांनी सगल दुसऱ्या दिवशी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सर्वोत्तम पुरस्कार (Australian Cricket Awards ) नावावर केले. यापूर्वी 2021 साली यालातील प्रदर्शनासाटी या दोघांना या पदकांनी सन्मानित केले गेले होते आणि सोमवारी सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार स्मिथ आणि मुनीला मिळाला. त्याव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याला शेन वॉर्न कसोटी प्लेअर ऑफ द ईयर पुरस्कान मिळाला. यावर्षी पहिल्यांदाच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिवंगत शेन वॉर्न याच्या नावाने हा पुरस्कार दिला. त्याव्यतिरिक्त ख्वाजाने कम्युनिटा इम्पॅक्ट पुरस्कार देखील आपल्या नावावर केला.

ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर याने संघासाठी मागच्या वर्षी अनेक सामने खेळले आणि महत्वापूर्ण भूमिका देखील बजावली. यासाठी वॉर्नरला सर्वोश्रेष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला. अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस याला टी-20 प्लेअर ऑफ द ईयर पुरस्कार मिळाला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून दिल्या गेलेल्या सर्व पुरस्कारांनी यादीत समोर आली आहे. यात एकूण 14 खेळाडूना पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. यात पुरुष आणि महिला दोन्ही क्रिकेटपटूंचा समावेश आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंची यादी –
एलन बॉर्डर पदक
विजेता – स्टीव स्मिथ. उपविजेता – ट्रैविस हेड, डेविड वार्नर.

बेलिंडा क्लार्क पुरस्कार:
विजेता – बेथ मूनी. उपविजेता – मेग लैनिंग, ताहलिया मॅक्ग्रा.

शेन वॉर्न मेन्स टेस्ट प्लेयर ऑफ द ईयर:
विजेता – उस्मान ख्वाजा. उपविजेता – मारनस लबसचगने, स्टीव स्मिथ.

महिला वनडे प्लेयर ऑफ द ईयर:
विजेता – बेथ मूनी. उपविजेता – मेग लैनिंग, एलिसा हीली.

मेन्स वनडे प्लेयर ऑफ द ईयर:
विजेता – डेविड वॉर्नर. उपविजेता – स्टीव स्मिथ, ट्रैविस हेड.

फीमेल टी20 प्लेयर ऑफ द ईयर:
विजेती – ताहलिया मैकग्राथ. उपविजेती – बेथ मूनी, एशले गार्डनर.

पुरुष टी20 प्लेयर ऑफ द ईयर:
विजेता – मार्कस स्टोइनिस. उपविजेता- जोश हेजलवुड, मैथ्यू वेड, ग्लेन मैक्सवेल.

केएफसी बीबीएल |12 प्लेयर ऑफ द टूर्नामेंट:
विजेता – मैट शॉर्ट (एडिलेड स्ट्राइकर्स).

वेबर डब्ल्यूबीबीएल | 08 प्लेयर ऑफ द टूर्नामेंट:
विजेती – एशले गार्डनर (सिडनी सिक्सर्स).

महिला डोमेस्टिक प्लेयर ऑफ द ईयर:
विजेती – एनाबेल सदरलैंड.

मेन्स डोमेस्टिक प्लेयर ऑफ द ईयर:
विजेता – माइकल नेसर.

बेट्टी विल्सन यंग क्रिकेटर:
विजेती – कर्टनी सिप्पल.

ब्रैडमन यंग क्रिकेटर:
विजेता – लांस मॉरिस.

कम्यूनिटी इम्पॅक्ट अवॉर्ड:
विजेता – उस्मान ख्वाजा.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
म्हारी छोरियां छोरों से कम हैं के! वर्ल्डकप विजयानंतर भारतीय महिलांचा ‘काला चष्मा’वर धमाल डान्स
पहिल्या दोन टी20त फ्लॉप ठरलेल्या गिल-ईशानपैकी कुणाच्या जागी मिळावी पृथ्वीला संधी? जाफरने स्पष्टच सांगितलं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---