आगामी महिला टी20 विश्वचषक 2024 स्पर्धा बांग्लादेशमध्ये आयोजित केली जाणार आहे. पण बांग्लादेशची सध्याची स्थिती चांगली नाही. देशात आरक्षणाबाबत हिंसक आंदोलन झाले आहे. एका अहवालानुसार, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) होस्टिंगचा प्रस्ताव दिला होता. मात्र बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी स्पष्ट नकार दिला. आता यूएई मध्ये महिला टी20 विश्वचषक 2024 चे आयोजन केले जाऊ शकते. मात्र, याबाबत अधिकृत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
क्रिकबझच्या बातमीनुसार, आयसीसी महिला टी20 विश्वचषकाच्या आयोजनासाठी दुबई किंवा अबू धाबीचा विचार करत आहे. मात्र बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने त्याच्याकडे अजूनही वेळ मागितली आहे. याबाबत आयसीसी लवकरच निर्णय घेईल. यासंदर्भात ऑनलाइन बैठकही प्रस्तावित करण्यात आली आहे. बीसीबीने आयसीसीकडे अतिरिक्त वेळ मागितला होता. त्यामुळे 20 ऑगस्टपर्यंत याबाबत निर्णय होऊ शकतो.
महिला टी20 विश्वचषक आयोजित करण्यासाठी भारत हा एक चांगला पर्याय होता. मात्र जय शहा यांनी कार्यक्रम आयोजित करण्यास नकार दिला होता. ते म्हणाले की, सध्या देशात पावसाळा सुरू आहे. मंडळाला आणि प्रत्येकाला असे वाटू नये की त्यांना सतत स्पर्धांचे आयोजन करायचे आहे. मात्र, बांग्लादेशने अद्याप यजमानपदाची आशा सोडलेली नाही. सुरक्षा पुरवण्याच्या मुद्द्यावर बोर्डाने लष्करप्रमुखांशी चर्चा केली आहे. ही स्पर्धा 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाणार आहे. यामध्ये 10 संघ सहभागी होणार असून 23 सामने खेळवले जाणार आहेत.
आयसीसी बांग्लादेश सारख्या देशाच्या शोधात आहे, जिथे महिला टी20 विश्वचषक स्पर्धा आयोजित करता येईल. तो बांग्लादेशसारखाच टाइम झोन असलेला देश पाहत आहे. जेथे हवामानाची कोणतीही समस्या नसावी. या स्थितीत युएई परफेक्ट आहे. एमिरेट्स क्रिकेट बोर्डाकडे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आहेत. यजमानपदासाठी झिम्बाब्वे आणि श्रीलंकाही इच्छुक आहेत. मात्र याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
हेही वाचा-
“भारत भाग्यवान आहे…” माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने केंद्रीय करार नाकारलेल्या खेळाडूंबद्दल दिली परखडं प्रतिक्रिया
पाकिस्तानच्या दिग्गजानं सांगितले जगातील दोन आवडते खेळाडू, दोन्हीही भारतीयचं!
दिनेश कार्तिकने निवडले टीम इंडियाची ऑलटाइम प्लेइंग इलेव्हन, संघातील विश्वासूलाच ठेवले बाहेर