भारतीय क्रिकेटमध्ये गाैतम गंभीर युगाला सुरुवात होणार आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी विश्वविजेत्या संघाच्या हेड कोचच्या पदी गंभीरच्या नावाची घोषणा केली होती. तेव्हा पासून भारतीय चाहत्यांची टीम इंडिया प्रती उत्सुकता वाढली आहे. गंभीर हा असा व्यक्तीमत्व आहे, जो युवा खेळाडूंना यशापर्यंत घेऊन जावू शकतो. ज्याचे उदाहरण आयपीएलमध्ये केकेआरचा संघ आहे. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाइट रायडर्सने 2024 चे खिताब जिंकले होते. वास्तविक, गाैतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षक पदाचे कार्यकाळ आगामी श्रीलंका दाैऱ्यापासून होणार आहे. ज्यामध्ये भारत टी20 आणि एकदिवसीय सामने खेळणार आहे.
टी20 विश्वचषक 2024 मध्ये खेळणाऱ्या बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना एकदिवसीय सामन्यांमधून विश्रांती देण्याची अपेक्षा आहे. लवकरच संघाची घोषणा झाल्याने संघाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू होणार आहे. दरम्यान आज (17 जुलै) श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा होत असताना कर्णधारपदी सूर्यकुमार यादवच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. संघाच्या घोषणेपूर्वी, स्टार स्पोर्ट्स, वर्ल्ड कपचे अधिकृत प्रसारक, 2023 मधील गौतम गंभीरचा एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये तो एकदिवसीय क्रिकेटबद्दल बोलतो आणि काही मनोरंजक टिप्पण्या केल्या.
पुढे तो म्हणतो- “मला नेहमी वाटतं, जेव्हा तुम्ही या नवीन पद्धतीबद्दल बोलता तेव्हा तुम्हाला अशा खेळाडूंची ओळख करून द्यावी लागेल जे त्या भूमिका किंवा ते उद्देश अगदी सहजपणे स्वीकारू शकतात. काही लोक फक्त उद्देश जुळवून घेऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांना नैसर्गिक नसलेल्या विशिष्ट पद्धतीने जूळवून खेळायला का भाग पाडायचे. आपल्याला एका विशिष्ट साच्यात खेळायचे आहे, असा विचार करण्यापेक्षा खेळाडूंना ओळखणे आणि योग्य ते मिश्रण मिळवणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे आपल्याला समान मानसिकतेचे सर्व 15 खेळाडू मिळावावे लागतील. समान उद्देश एकत्र निवडणे आवश्यक आहे”. तर अश्या परिस्थितीत बीसीसीआय भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना स्थान देणार, हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे.
महत्तवाच्या बातम्या-
रोहितला ऐकावा लागला प्रशिक्षक गंभीरचा आदेश! वनडे मालिकेतून पुनरागमन करण्याची शक्यता
श्रीलंका दौऱ्याआधीच भारत-पाकिस्तान आमने-सामने…! पाहा कधी होणार सामना?
यशस्वी जयस्वालला बंपर फायदा, गिलची 36 स्थानांची झेप! ताजी टी20 क्रमवारी जाहीर