---Advertisement---

२०१० प्रमाणेच चेन्नई यंदाही होणार चॅम्पियन? नक्की काय आहेत कारणे

On: गुरूवार, ऑक्टोबर 15, 2020 10:38 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या हंगामाचा निम्मा प्रवास पूर्ण झाला आहे.अर्धी स्पर्धा सामन्यांनंतर आता प्लेऑफचे चित्रही समोर येत आहे. तीन वेळा चॅम्पियन झालेला चेन्नई सुपर किंग्ज संघाने आतापर्यंत खेळलेल्या ८ सामान्यांपैकी केवळ ३ सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत त्याच्या प्लेऑफच्या आशा देखील धूसर दिसत आहेत. पण जर दुसऱ्या बाजूने विचार केला तर चेन्नई संघ प्ले ऑफमध्ये अजूनही प्रवेश करू शकतो. विशेष म्हणजे २०१० मध्येही चेन्नईची कामगिरी काहीशी अशीच होती. त्यामुळे यावेळीही चाहत्यांना चेन्नई कडून प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याच्या अशा आहेत. २०१० ला चेन्नईने पहिल्यांदा आयपीएलचा विजेतेपद जिंकले होते.

२००८ पासून कर्णधार असलेल्या एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत तीन वेळा आयपीएल विजेतेपद जिंकले आहे. मागील कामगिरी पाहता चेन्नई पुन्हा एकदा चॅम्पियन बनू शकेल. असे आम्ही नाही तर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने त्याच्या ट्विट द्वारे म्हटले आहे.

आकाश चोप्राने एका ट्विटमध्ये चेन्नई सुपर किंग्ज चॅम्पियन होण्याचा अंदाज वर्तविला आहे. या ट्विटमध्ये पाच बाबी आहेत. या सर्व बाबी २०१० मध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएलशी संबंधित आहेत, ज्याची २०२० मध्येही पुनरावृत्ती होताना दिसत आहे.

१. आकाश चोप्राच्या ट्विटमध्ये दिलेल्या पहिल्या बाबीनुसार, २०१० या वर्षी आयपीएलचा तिसरा हंगाम होता आणि २०२० हे चेन्नई सुपर किंग्ज संघ बंदीनंतर पुन्हा मैदानात परतल्यानंतरचे तिसरे वर्ष आहे.

२. दुसर्‍या बाबीनुसार, २०१० मध्ये आयपीएलच्या पहिल्या ७ सामन्यानंतर चेन्नईचा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर होता आणि २०२० मध्येही ७ सामन्यानंतर संघ त्याच स्थानावर होता.

३. तिस-या बाबीनुसार, आयपीएल २०१० आणि आयपीएल २०२० या दोन वर्षी एकूण २८ सामन्यांनंतर किंग्ज इलेव्हन पंजाब संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर होता. म्हणजेच शेवटच्या क्रमांकावर.

४. चौथ्या बाबीनुसार, २०१० मध्ये आयपीएलच्या अर्ध्या प्रवासानंतर दोन संघ ६-६ गुणांसह बरोबरीत होते. यावेळीही तशीच परिस्थिती होती.

५. पाचवी बाब म्हणजे, २०१० मधील निम्म्या आयपीएल प्रवासानंतर मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर होता. यावेळीही प्रत्येक संघाचे ७ सामने खेळून झाल्यानंतर मुंबई संघ अव्वल स्थानी होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---