आपणा सर्वांना माहिती आहे की, सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशातील क्रीडा स्पर्धा जवळपास रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व खेळाडूंसमोर आपापल्या घरात बसण्याशिवाय पर्याय नाही. अशामध्ये ऑस्ट्रेलियानेही आपल्या सीमा ६ महिन्यांसाठी बंद केल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूही घरामध्ये बंद आहेत.
या व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियातील खेळाडूंना (Australian Players) अनेक समस्या निर्माण होत आहेत. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लॉकडाऊनमुळे (Lockdown) खेळाडूंचा पगारही बंद झाला आहे. त्यामुळे त्यांना आपले घर चालविण्यासही समस्या येत आहे.
काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या व्हायरसमुळे (Corona Virus) जी परिस्थिती उद्भवली आहे त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या अनेक क्रिकेटपटूंना तेथील सरकारची मदत मिळत नाही. ऑस्ट्रेलियाचे माजी आणि सध्या खेळत असलेले खेळाडू जे बाहेरच्या उत्पन्नावर अवलंबून आहेत, त्यांना या व्हायरसचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.
खेळाडूंच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशनने बुधवारी (८ एप्रिल) अडीच लाख ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच जवळपास एक कोटीपेक्षा अधिक रुपये देण्याची घोषणा केली आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशनने (Australian Cricket Association) यावेळी सांगितले की, “आमचे सदस्य जे सरकारी मदतीची वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी आमच्याकडून आणीबाणीच्या काळात वापरला जाणारा निधी देत आहोत. आम्ही त्यांच्यासाठी अडीच लाख डॉलरची मदत केली आहे.”
ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंना सोडले तर बाकीच्या खेळाडूंचे उत्पन्न फार नाही. त्यामुळे या खेळाडूंना पैसे कमाविण्यासाठी इतर कामे करावी लागतात.
ट्रेंडिंग घडामोडी-
-वनडेत ११व्या स्थानी सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू
-रविंद्र जडेजाची नक्कल केलेला डेविड वाॅर्नरचा व्हिडीओ आला समोर
-या भारतीय गोलंदाजाला खेळणे महाकठीण- स्टिव स्मिथ