---Advertisement---

कुलदीप यादव अंतिम 11मध्ये हवाच, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूचे मत

On: शुक्रवार, जुलै 20, 2018 12:49 PM
---Advertisement---

भारत-इंग्लंड यांच्यातील बहुप्रतीक्षित कसोटी मालिकेला 1 ऑगस्ट पासून सुरवात होत आहे. गेल्या एक वर्षापासून भारतासाठी कुलदीप यादवने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे कुलदीपला या कसोटी मालिकेसाठी 18 सदस्यीय भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

भारतीय निवड समितीच्या या निर्णयाचे इंग्लंडचे माजी फिरकीपटू फिल टफनेल यांनी स्वागत केले आहे. तसेच कुलदीप यादवला या कसोटी मालिकेत अंतिम अकरा खेळाडूंच्या संघात स्थान द्यावे असे मत टफनेल यांनी व्यक्त केले आहे.

“जगभरात तुम्हाला खुपच कमी चायनामन गोलंदाज मिळतील. त्यापैकी कुलदीप एक आहे. जेव्हा तुमच्याकडे कुलदीपसारखे कौशल्यपूर्ण गोलंदाज असतात तेव्हा तुम्ही त्यांना संधी देण्याची गरज असते. त्यामुळे मला असे वाटते की, इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताते कुलदीपला अकरा खेळाडूंच्या अंतिम संघात स्थान द्यावे.” फिल टफनेल यांनी या शब्दात कुलदीपचे कौतूक करत, त्याला कसोटी मालिकेत संधी मिळावी असे मत व्यक्त केले.

कुलदीप यादव गेल्या एक वर्षापासून भारताच्या टी-20 आणि एकदिवसीय संघाचा नियमित सदस्य आहे. आयपीएल पूर्वी पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत अप्रतिम कामगिरी केली होती.

त्यानंतर इंग्लंड विरुद्ध झालेल्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतही भारताकडून एकमेव कुलदीप यादवने चांगली कामगिरी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-रशिद खान म्हणतो, कृणाल आपणही हे करायला हवे

-ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा यू टर्न, विराट विषयी मी असे म्हणालोच नव्हतो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment