---Advertisement---

आपल्या वाणीने लाखो आयपीएलप्रेमींना घायाळ करणारी ‘ती’ यंदाही गेली कुठे? चाहत्यांनी काढली आठवण

On: सोमवार, एप्रिल 12, 2021 1:31 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील ३ रंगतदार सामने पार पडले आहेत. या स्पर्धेत फक्त मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंचीच चर्चा नसते तर आयपीएलचा एका अर्थाने भाग असलेले समालोचकही तितक्याच चर्चेत असतात. अशातच भारतीय क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नी याची पत्नी आणि प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर मयंती लंगर, आयपीएल २०२१ मध्ये नसल्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी निराशा व्यक्त केली आहे.

आयपीएल २०२१ हंगामासाठी जेव्हा समलोचकांची यादी जाहीर करण्यात आली होती, तेव्हा त्या यादीमध्ये मयंतीचे नाव नव्हते. हे पाहून अनेकांचे मन तुटले होते. मयंतीची समालोचन करण्याची पद्धत आणि तिचे सौंदर्य या दोन्ही गोष्टींनी चाहत्यांना भारावून टाकले आहे. परंतु या हंगामात देखील ती नसल्याने अनेकांनी ट्विट करत आपली व्यथा मांडली आहे.

त्यातही तिने रविवारी (११ एप्रिल) आपला एक फोटो शेअर केल्याने चाहत्यांना पुन्हा एकदा तिची आठवण झाली आहे. अनेकांनी प्रतिक्रिया देत तिच्या समालोचनाची उणीव भासत असल्याचे म्हटले आहे.

https://twitter.com/MayantiLanger_B/status/1381214046582579201?s=20

तिने युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत देखील समालोचन केले नव्हते. त्यावेळी तिने आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला होता. तिने याबाबतची माहिती ट्विट करत दिली होती. परंतु या हंगामात तिचे आयपीएलमध्ये समालोचन न करण्याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. असे म्हटले जात आहे की, तिने कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यासाठी आयपीएल २०२१ स्पर्धेत समालोचन करण्यास नकार दिला.

मयंतीने आतापर्यंत २०११ क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, २०१४ इंडियन सुपर लीग, २०१५ क्रिकेट विश्वचषक स्पर्धा तसेच २०१९ विश्वचषक क्रिकेट स्पर्धांमध्ये समालोचन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘माझ्यासाठी आयपीएल म्हणजेच…,’ आंद्रे रसेलच्या त्या विधानाने जिंकली कोट्यावधी भारतीयांची मने

मुंबई इंडियन्सला गवसला कोहिनूर! धाकट्या भावानंतर थोरल्याला दिली जागा, ‘अशी’ राहिलीय त्याची कामगिरी

“जोफ्रा आर्चरचं नसणं राजस्थान संघासाठी मोठा धक्का,” पंजाब विरुद्धच्या लढतीपुर्वी संगकाराने व्यक्त केली चिंता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---