नुकतीच महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा पार पडली. या स्पर्धेला मुंबई इंडियन्स संघाच्या रूपात पहिला विजेता मिळाला. आता या स्पर्धेनंतर क्रिकेटप्रेमींचे लक्ष इंडियन प्रीमिअर लीगकडे लागले आहे. या स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला जाणार आहे. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सीएसके संघ चेपॉक स्टेडिअमवर जोरदार तयारी करत आहे. सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी याचा यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चाहते धोनीच्या एन्ट्रीवर त्याचे नाव घेत आहेत. तसेच, दुसऱ्या एका व्हिडिओत धोनी जोरदार षटकार मारत आहे.
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने सोमवारी (दि. 27 मार्च) त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत एमएस धोनी (MS Dhoni) फलंदाजीचा सराव करण्यासाठी मैदानावर उतरताना दिसला. धोनीने जसा मैदानात पाय ठेवला, तसा चाहत्यांनी ‘धोनी- धोनी’ नावाचा गजर केला.
दुसरीकडे, सरावादरम्यानचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये धोनी शानदार षटकार (MS Dhoni Six) खेचताना दिसत आहे. धोनीने यापूर्वीही सरावादरम्यान गगनचुंबी षटकार मारले आहेत. धोनीचा हा फॉर्म पाहून चाहते भलतेच खुश आहेत. चाहत्यांना आशा आहे की, आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेतही धोनी दमदार फलंदाजी करेल.
https://twitter.com/ChennaiIPL/status/1640601919273189377
धोनीचा अखेरचा आयपीएल हंगाम?
धोनी 2008च्या पहिल्या आयपीएल हंगामापासून सीएसके (CSK) संघाचा भाग राहिला आहे. तसेच, त्याने संघाचे नेतृत्वही केले आहे. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली संघाला 4 वेळा आयपीएल किताब जिंकून दिला आहे. आता असे म्हटले जात आहे की, आयपीएल 2023 ue धोनीचा शेवटचा हंगाम असू शकतो. धोनीने आधीच स्पष्ट केले आहे की, त्याला आयपीएलचा शेवटचा सामना चेन्नईच्या चाहत्यांसमोर खेळायचा आहे. (cricket fans chants dhoni dhoni on ms dhoni s entry in chepauk stadium see video here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सलाम रे पठ्ठ्या! 5 वर्षीय बॉल-बॉयला वाचवण्यासाठी स्वत: जखमी झाला विंडीजचा कर्णधार, व्हिडिओ करेल भावूक
एकच मारला पण कच्चून मारला! फलंदाजाने स्टेडिअमबाहेर चेंडू मारत नसीमला दाखवल्या चांदण्या, व्हिडिओ व्हायरल






