पुणे, दि. ४ नोव्हेंबर २०२३- पुण्याजवळील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यानंतर इंग्लंडच्या माजी कर्णधाराने सोशल मीडियावर शाहरूख खानच्या शैलीत होत पसरलेले आपले छायाचित्र पोस्ट केले आणि त्याबरोबर मजकूर होता…’भारावून टाकणारे वातावरण… पुण्यातील लढतीसाठी प्रचंड संख्येने उपस्थित प्रेक्षक पाहून अतिशय आनंद झाला. ‘
पुण्यात झालेल्या न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका लढतीचे वर्णन करण्यासाठी ही पोस्ट पुरेशी बोलकी होती. प्रेक्षकांसाठी शक्य त्या सर्व सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असतो. तरीही काही त्रुटी राहून जाण्याची शक्यता असते, असे सांगून एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले, की या सामन्यानंतर आम्ही प्रेक्षक आणि माध्यमांकडून स्टेडियमवरील सुविधा आणि त्रुटींबद्दल प्रतिक्रिया घेतल्या आणि त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर प्रेक्षकांना सामन्याचा आनंद घेता येणे महत्त्वाचे असते.
त्यामुळेच मला सांगण्यास अतिशय आनंद होतो, की एमसीएच्या वतीने यानंतर होणाऱ्या सामन्यांसाठी प्रेक्षकांच्या वाहनांकरिता पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे सांगून पवार म्हणाले, की १५ हजार दुचाकींसाठी, तसेच सात हजार मोटारींसाठी विनामूल्य पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याआधीच्या सामन्यात प्रेक्षकांना पार्किंग मिळण्यात अनेक अडचणी आल्या होत्या. त्याचा विचार करून मोठ्या संख्येने सूचनाफलक आणि सुरक्षा रक्षकही नेमण्यात आले असल्याचे सांगून पवार म्हणाले, की सर्व सहकारी प्रायोजकांच्या सहकार्यामुळे सर्व प्रेक्षकांसाठी विनामूल्य पिण्याच्या पाण्याचीही सोय करण्यात आली आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना स्टेडियमवर नेण्या- आणण्यासाठी, तसेच त्यांच्या वृत्तांकनासाठा सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय माध्यम प्रतिनिधींनीही स्टेडियमवरील सुविधांची प्रशंसा केली आहे.
आयसीसी अध्यक्ष ग्रेग बर्कले आणि भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन हे सुद्धा या सामन्याला हजर होते. त्यांनीही स्टेडियमवरील वातावरणाचा आनंद घेतला व एमसीएने केलेल्या व्यवस्थेची प्रशंसा केली, असे सांगून पवार म्हणाले, की यानंतर या स्टेडियमवर ८ नोव्हेंबर रोजी इंग्लंड विरुद्ध नेदरलँड, तर ११ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगला देश असे सामने होणार असून दोन्ही सामन्यांना प्रेक्षक प्रचंड संख्येने उपस्थित राहतील, असा मला विश्वास आहे.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पुन्हा भारतात लवकर होणार नाही. त्यामुळे विश्वचषकासारख्या स्पर्धेतील सामने पाहण्याची संधी गमावू नका. बाकी ठिकाणचे प्रेक्षक हे सामने टेलिव्हिजनवरून पाहणार आहेत. परंतु पुण्यातील क्रिकेटशौकिनांनी गहुंजे येथील सुसज्ज स्टेडियमवर उपस्थित राहून या सामन्यांचा आणि एमसीएने केलेल्या सुविधांचाही पुरेपूर आनंद लुटावा, असे आवाहन राहित पवार यांनी केले. (Cricket fans should enjoy the World Cup to the fullest – MCA President Rohit Pawar)
महत्वाच्या बातम्या –
पावसानंतर विजय पाकिस्तानच्या अजून जवळ, डीएलएसनुसार करायच्या आहेत फक्त ‘इतक्या’ धावा
ऑस्ट्रेलियावर भारी पडले इंग्लंडचे गोलंदाज, षटके संपण्याआधी संघ सर्वबाद, फक्त एकाचे अर्धशतक